Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री आज लॉकडाऊनवर नेमकं काय बोलणार?, अवघ्या महाराष्ट्राचं उद्धव ठाकरेंकडे लक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज (21 एप्रिल) रात्री 8 वाजेच्या सुमारास राज्यातील जनतेला सोशल मीडिया लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून संबोधित करणार आहेत. यावेळी ते याचविषयी घोषणा करणार असल्याचं समजतं आहे. मात्र, हा लॉकडाऊन नेमका कशा स्वरुपाचे असेल याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वांचं लक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाकडे आहे.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण हे सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्यातील परिस्थिती ही अत्यंत गंभीर झाली आहे. अशावेळी आता मुख्यमंत्री कठोर लॉकडाऊन करणार की नाही याकडेच लोकांचं लक्ष असणार आहे.

महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Lockdown हा शेवटचा पर्याय ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना कळकळीचं आवाहन

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार?

ADVERTISEMENT

मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना असं म्हटलं होतं की, Lockdown हा शेवटचा पर्याय म्हणून अवलंबवावा. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं होतं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आता मुख्यमंत्री कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 62 हजारांपेक्षा नवे Corona रूग्ण, 519 मृत्यू

राज्यात नवे निर्बंध देखील लागू

दरम्यान, राज्यात कालपासून नवे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात आता आरोग्य सेवेशी संबंधित दुकानं वगळता सर्व दुकानं ही सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत.

काय आहेत नवे निर्बंध?

  • किराणा मालाची दुकानं, भाजीपाला विक्री, फळ विक्री, डेअरी, बेकरी, खाद्य पदार्थ विकणारी सगळी दुकानं ज्यामध्ये मटण, चिकन, अंडी, मासे विक्री केंद्राचाही समावेश आहे तसंच कृषीशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांचं खाद्य मिळणारी दुकानं ही सगळी दुकानं सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच खुली राहणार आहेत. यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय इतरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

  • सगळ्या दुकांनाना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. मात्र कोरोनाची स्थिती पाहून त्यासंदर्भातला निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे

  • आपत्कालीन व्यवस्था विभागाला या नियमांमध्ये आणखी काही नियमांची भर घालायची असेल तर ते घालू शकतात अशीही बाब या आदेशात नमूद करण्यात आली आहे.

  • या आधी 13 एप्रिलला जो आदेश काढण्यात आला होता त्यातले सर्व नियमही तसेच लागू असतील त्यापैकी कोणत्याही नियमांना शिथीलता देण्यात आलेली नाही

  • दारूची दुकानं पूर्णतः बंद करण्यात आली आहे

  • रिक्षा, टॅक्सी सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच उपलब्ध होणार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT