महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तासात असं काय घडलं की फडणवीस उपमुख्यमंत्री झाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवी राजकीय वळणं येत आहेत. आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, नंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी न झाल्यानेही सर्वांनाच धक्का बसला. मात्र फडणवीस सरकारमध्ये सामील न होण्याच्या चर्चा शांत होतात न होतात तोच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे दिल्लीतून आदेश दिले. भाजपचे अध्यक्ष जेपी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवी राजकीय वळणं येत आहेत. आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, नंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी न झाल्यानेही सर्वांनाच धक्का बसला. मात्र फडणवीस सरकारमध्ये सामील न होण्याच्या चर्चा शांत होतात न होतात तोच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे दिल्लीतून आदेश दिले.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुरुवातीलाच फडणवीस यांनी मोठे मन दाखवल्याचे सांगितले. मात्र त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी माझी इच्छा आहे असे नड्डा म्हणाले. पण काही वेळातच जेपी नड्डा यांनी आणखी एक ट्विट केले आणि म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले आहे. अशा स्थितीत दिल्लीतून आदेश येताच देवेंद्र फडणवीस यांनाही हायकमांडचा मान राखावा लागला.
भाजपा ने महाराष्ट्र की जनता की भलाई के लिए बड़े मन का परिचय देते हुए एकनाथ शिंदे जी का समर्थन करने का निर्णय किया। श्री देवेन्द्र फडणवीस जी ने भी बड़े मन दिखाते हुए मंत्रिमंडल में शामिल होने का निर्णय किया है, जो महाराष्ट्र की जनता के प्रति उनके लगाव को दर्शाता है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 30, 2022
जेव्हा फडणवीस यांनी सहमती दर्शवली तेव्हा नड्डा यांनी दुसर्या ट्विटमध्ये लिहिले की, भाजपने महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी मोठे मन दाखवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. श्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली ओढ दिसून येते. एकनाथ शिंदे जी आणि देवेंद्र फडणवीस जी यांचे अभिनंदन असेही ते म्हणाले.
भाजपच्या आजच्या कृतीवरुन हे दिसून आले की त्यांना मुख्यमंत्रीपदाची कधीच इच्छा नव्हती. 2019 च्या निवडणुकीत स्पष्ट जनादेश नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांना होता असे भाजप नेते म्हणत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी आपल्याला सोडून विरोधकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले अशीही टिका ठाकरेंवरती होत आहे.