राज ठाकरे सध्या कुठला इतिहास वाचत आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात त्यांनी एका पुस्तकांच्या दुकानला भेट दिली आणि तिथून हजारो रुपयांची पुस्तकं खरेदी केली आहेत. यामध्ये बरीचसी पुस्तकं ही ऐतिहासिक आहेत. ज्यामध्ये कादंबरी आणि दस्तावेज यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

आपल्या 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे सुरुवातीलाच मीडियावर भडकले होते. मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे बाजीराव रोडवर गेले. इथे पदाधिकाऱ्यांबरोबरची मिटिंग संपल्यावर त्यांनी आपला मोर्चा आपल्या एका लाडक्या ठिकाणाकडे वळवला.. ते त्यांचं ठिकाण म्हणजे पुण्यातलं अक्षरधारा पुस्तकालय.

पुणे दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांची तुफान चर्चा झाली ती त्यांच्या राजकीय वक्तव्याची नाही तर त्यांच्या वाचनप्रेमाची. कारण व्यस्त नियोजनातून वेळ काढून त्यांनी संध्याकाळी अक्षरधारा पुस्तकालय गाठलं.

हे वाचलं का?

तब्बल दीड तास ते या पुस्तकालयात होते. तेव्हा पुस्तक खरेदी करण्यासाठी एक-एक पुस्तक निरखून पाहत असताना दिसले.

दीड तासाच्या या कालावधीत राज ठाकरेंनी गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, वा. सी. बेंद्रे यांच्या रियासतचे सर्व खंड, शिवाजी सावंत यांची काही पुस्तके, अशी होती शिवशाही, पेशवे घराण्याचा इतिहास यासारखी पुस्तकं खरेदी केली.

ADVERTISEMENT

अत्यंत चोखंदळपणे राज ठाकरेंनी एक-एक पुस्तकाची माहिती घेत ही खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या खरेदीची यादी चांगलीच मोठी असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे सध्या राज ठाकरे हे शिवछत्रपती आणि त्यांच्याशी संबंधित इतिहास वाचत असल्याचं या पुस्तक खरेदीवरुन तरी दिसतं आहे.

राज ठाकरे यांना सुरुवातीपासूनच पुस्तक वाचनाचा छंद आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी देखील हजारो पुस्तकं आहेत. ज्यामध्ये आता या पुस्तकांची देखील भर पडली आहे.

जगू द्याल की नाही? जेव्हा Raj Thackeray पुण्यात पत्रकारांवर संतापतात, पाहा व्हिडीओ

पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार?

मुंबई-ठाणे आणि औरंगाबाद येथील सभांमध्ये मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा गाजवल्यानंतर राज ठाकरे आपली चौथी सभा पुण्यात घेणार असल्याचं कळतंय. २१ मे रोजी ही सभा होणार असल्याचं कळतं आहे. पुण्यातील भिडे पुलाशेजारी असलेल्या नदीपात्राचं ठिकाण निवडण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्यांकडून आणि पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी केली जाईल. या सभेला काय नियम आणि अटी लावायच्या? याचा निर्णय पोलीस घेतील असंही मनसेने म्हटलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT