समजून घ्या : कोरोना लसीचे ‘कॉकटेल’ डोस म्हणजे काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना लसीचा एक डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेतला तर काय होईल? दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेतले तर ते फायदेशीर की त्याचे काही दुष्परिणाम होतात? दोन वेगळ्या कंपन्यांचे डोस घ्यायला मला परवानगी आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत. पण तुम्हाला माहितेय, जगातल्या काही देशांमध्ये अशाप्रकारचे प्रयोग करण्यात आलेत, आणि नागरिकांना दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस द्यायला सुरूवातही झाली आहे….त्यामुळेच कोरोना लसीचा एक डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेतल्याने नेमकं काय होतं, ते किती फायदेशीर हेच समजून घेऊयात….

ADVERTISEMENT

1. सगळ्यात पहिले जाणून घेऊयात….की लसीचे दोन डोस मिक्स करणं म्हणजे नेमकं काय?

भारतात सध्या तरी एका कोव्हिशिल्ड लसीचा तुम्ही एक डोस घेतला असेल, तर दुसरा डोसही तुम्हाला कोव्हिशिल्ड लसीचाच घ्यावा लागतो, आणि असाच नियम कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक साठी आहे. पण भारतात लसीचे डोस मिक्स करणं म्हणजे कोव्हिशिल्डचा एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कोवॅक्सीन किंवा स्पुटनिकचा घेणं याला जूनपर्यंत तरी मान्यता देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

2. दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस घेतल्याने काय फायदा?

तर काही शास्त्रज्ञांच्या मते…एकाच लसीचे दोन डोस घेण्यापेक्षा, एक डोस एका कंपनीच्या लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लसीचा घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती जास्त चांगली तयार होते. इतकंच नाही तर कोरोनाचे जे नवनवे स्ट्रेन/वेरिएंट सापडू लागले आहेत, त्यावरही अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस देणं जास्त प्रभावी ठरेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

3. एकाच लसीचे दोन डोस घेतल्याने काय होऊ शकतं?

ADVERTISEMENT

आपण कोव्हिशिल्ड लसीचं उदाहरण पाहू….कोव्हिशिल्ड लसीच्या डोसमधून शरीरात चिंपाझीमधील कोरोनाचा कमकुवत विषाणू सोडला जातो…त्याला अडोनोव्हायरस असंही म्हणतात… या व्हायरसविरोधात आपल्या शरीरात कोरोनाविरोधातल्या अँटीबॉडीज तयार होतात…

जेव्हा दुसऱ्या डोसमधूनही अड़ोनोव्हायरस शरीरात सोडला जातो, तेव्हा शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज या अडोनोव्हायरसलाच नष्ट करण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे दुसऱ्या डोसमधून नव्याने अँटीबॉडीज तयार होणारच नाहीत, असं होऊ शकतं.

स्पेनच्या कारलोस हेल्थ इन्सिट्यूटने एक प्रयोग केला, आणि त्यांच्या अभ्यासात काय समोर आलं, ते बघा

कोव्हिशिल्डचा पहिला डोस आणि फायझरचा दुसरा घेतला तर त्याचे जास्त चांगले परिणाम दिसून आले

या स्टडीमध्ये 673 लोकांचा समावेश होता

हे सर्व जण 60 वर्षांखालील होते

त्यातील 441 जणांना पहिला डोस कोव्हिशिल्ड तर दुसरा डोस फायझरचा दिला

जेव्हा त्यांच्या अँटीबॉडीज तपासल्या, तेव्हा इतरांपेक्षा त्यात 30-40 पट जास्त अँटीबॉडीज असल्याचं निष्पन्न झालं

या अभ्यासानुसार ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस आणि फायझर लसीचा दुसरा डोस घेतला त्यांच्यात साईड इफेक्ट्स दिसण्याचं प्रमाण अवघं 2 टक्के होतं.

Covishield चा दुसरा डोस ‘या’ लोकांना मिळणार 28 दिवसांनी, पाहा नेमका का करण्यात आला बदल?

4. कोणकोणत्या देशांमध्ये लसींचे मिक्स डोस द्यायला परवानगी?

कॅनडा, युके आणि युरोपियन युनियनने अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस द्यायला परवानगी दिलेली आहे. या देशांमध्ये अस्ट्राझेनेका लसीचा म्हणजेच ज्याला भारतात आपण कोव्हिशिल्ड लस म्हणतो, त्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर फायझर किंवा मॉडर्नाचा दुसरा डोस घेता येऊ शकतो.

स्पेन, दक्षिण कोरिया, रशिया आणि चीनमध्ये लसींचे दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस देता येऊ शकतात का? यावर अभ्यास सुरू आहे.

अमेरिकेत सुद्धा अपवादात्मक परिस्थितीत फायझर आणि मॉडर्नाचे मिक्स डोस घेता येऊ शकतात.

5. भारतात नेमकी काय परिस्थिती? लस मिक्स करणं कितपत योग्य ठरेल?

भारतात सध्या तरी तीनच लसी दिल्या जातायत…पण आणखी काही लसींनाही मान्यता मिळण्याची शक्यता दिसतेय…अशात कुठल्या एका लसीवर दुसऱ्या लसीचा डोस दिलेला चालतो का, यावरही प्रयोग होतील…आणि त्यानंतर निर्णय होईल, की भारतातही मिक्स डोस देता येऊ शकतात का?

6. एका लसीचा एक डोस आणि दुसऱ्या लसीचा दुसरा डोस घेतल्याने काही दुष्परिणाम/साईड इफेक्ट्स जाणवतील का?

तर आतापर्यंतच्या झालेल्या अभ्यासामध्ये तरी दोन लसीचे डोस मिक्स केल्याने गंभीर साईडइफेक्ट्स जाणवलेले नाहीत. आपलं शरीर सौम्य स्वरूपातल्या साईड इफेक्ट्स सहन करू शकते, असं ज्येष्ठ शास्त्रज्ञ, वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT