Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?
What is history of Shiv sena alliances: मुंबई: मुंबईत जन्म झालेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं राजकारण नेहमीच आक्रमक राहीलं आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना करताना मराठी भूमिपूत्रांचा विषय हाती घेत दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) आपल्या राजकारणाला (Politics) सुरुवात केलेली. तेव्हापासून हा पक्ष रस्त्यावर उतरून थेट भिडणारा असाच होता. मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने […]
ADVERTISEMENT
What is history of Shiv sena alliances: मुंबई: मुंबईत जन्म झालेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं राजकारण नेहमीच आक्रमक राहीलं आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना करताना मराठी भूमिपूत्रांचा विषय हाती घेत दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) आपल्या राजकारणाला (Politics) सुरुवात केलेली. तेव्हापासून हा पक्ष रस्त्यावर उतरून थेट भिडणारा असाच होता. मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने केवळ या एकाच गोष्टीच्या जीवावर आपल्या राजकारणाला दिशा दिली नाही. तर त्यांनी बेरजेच्या राजकारणातही वेळोवेळी बाजी मारली. ज्यासाठी बाळासाहेब आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या युती आणि आघाडी (Alliance) करत नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला आहे. (what is history of shivsena alliances how has it always used shock tactics in politics)
ADVERTISEMENT
खरं तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी आजवर अनेकदा अनाकलनीय अशा स्वरुपाचंच राजकारण केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषत: आघाडी आणि युतीच्या बाबतीत. शिवसेनेच्या या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी अनेकदा महाराष्ट्रालाही बुचकळ्यात टाकणाऱ्या राजकीय चाली खेळल्या आहेत. ज्यामुळे त्यांनी वेळोवेळी शिवसेनेचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.
असं म्हणतात की, राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो… याचं नेमकं उदाहरण हे आपल्याला शिवसेनेच्या युती-आघाडीच्या राजकारणातून पाहायला मिळतं. ज्या पक्षाला कधी काळी शिवसेनेनं शिव्यांची लाखोली वाहिली त्याच पक्षांसोबत त्यांनी युतीही केल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच शिवसेनेनं आजवर कधी आणि कोणत्या पक्षांशी युती किंवा आघाडी केली हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
बाळासाहेब ठाकरे : कागद संपून जाईल पण बाळासाहेबांच्या आठवणी संपणार नाहीत!
शिवसेनेची युती आणि आघाडीबाबतची क्रोनोलॉजी समजून घेऊयात…
- 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.
- दोनच वर्षांनी 1968 रोजी मुबंई महापालिका निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षासोबत युती केली. जी युती 1970 पर्यंत टिकली.
- 1972 शिवसेनेने- रा. सु. गवई यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती केली. पण ही युती अल्पकाळच टिकली.
- 1972 साली शिवसेनेने आणि मुस्लिम लीगसोबत युती करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
- 1978 साली शिवसेना आणि दलित पँथरमध्ये देखील युती झाली होती.
- 1977, 1980 साली शिवसेनेने इंदिरा काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पण त्यांची अधिकृत अशी युती नव्हती.
- शिवसेनेने सर्वात आधी 1984 साली भाजपसोबत युती केली होती. पण काही वर्षातच ही युती तुटली.
- 1985 साली शिवसेनेने समाजवादी काँग्रेसशी देखील युती केली होती.
- 1989 साली पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपमध्ये युती झाली. ज्यानंतर तब्बल 25 वर्ष ही युती टिकली.
- 2011 साली शिवसेनेने रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षाला आपल्यासोबत युतीत सामील करुन घेतलं आणि महायुतीची स्थापना केली. ज्यामध्ये नंतर छोटे-छोटे घटक पक्षही सामील झाले.
- 2014 साली भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आधी युती तोडली. मात्र, निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.
- 2019 लोकसभा-विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा अधिकृतपणे शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली.
- 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मोठा विजय मिळवला. पण विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली.
- 2019 साली शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी काही पोटनिवडणुका या महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांनी एकत्रितरित्या लढवल्या.
- 2022 साली शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष स्थापन झाले.
- 2023 साली शिवसेनेने (UBT) आपलं राजकीय अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत युती केली.
शिव-भीमशक्तीची युती: ‘…म्हणून आम्ही एकत्र आलोय’, ठाकरेंचं मोठं विधान
ADVERTISEMENT
आतापर्यंत अनेकदा शिवसेनेला पक्षातील फुटीला तोंड द्यावं लागलं आहे. पण प्रत्येक वेळी शिवसेनेने प्राप्त परिस्थितीतही वेगवेगळ्या पक्षांशी युती किंवा आघाडी करत आपलं राजकारण सुरु ठेवलं. ज्याचा प्रत्यय आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT