प्रिया रमाणींच्या एका ट्विटने लिहिला एमजे अकबरांच्या पतनाचा अध्याय
प्रिया रमाणी यांनी 2018 मध्ये एक ट्विट केलं आणि तिथून सुरू झाला तो एम जे अकबर या केंद्रीय मंत्र्याच्या पतनाचा अध्याय. 17 फेब्रुवारी 2018 ला त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. MeToo ची मोहीम त्यावेळी सुरू झाली होती. एमजे अकबर यांच्यावर जेव्हा हे आरोप झाले तेव्हा त्यांनी प्रिया रमाणींविरोधात अब्रू […]
ADVERTISEMENT

प्रिया रमाणी यांनी 2018 मध्ये एक ट्विट केलं आणि तिथून सुरू झाला तो एम जे अकबर या केंद्रीय मंत्र्याच्या पतनाचा अध्याय. 17 फेब्रुवारी 2018 ला त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. MeToo ची मोहीम त्यावेळी सुरू झाली होती. एमजे अकबर यांच्यावर जेव्हा हे आरोप झाले तेव्हा त्यांनी प्रिया रमाणींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला. मात्र या प्रकरणातून कोर्टाने प्रिया रमाणी यांना निर्दोष मुक्त केलं आहे. अब्रनुकसानीच्या या दाव्याची सुनावणी दोन वर्षे सुरू होती.
कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटलं आहे?
निर्णय देताना कोर्टाने प्रिया रमाणी यांनी केलेला खुलासा हा महिलांवर कार्यालयात होणारे लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणारा ठरल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने हे देखील मान्य केलं आहे की 1993-94 या वर्षामध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून तरतूद कऱण्यात आलेल्य विशाखा गाईडलाईन्स नव्हत्या. अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या महिलेला समाजातून अनेकदा घृणास्पद वागणूक मिळते, समाजाने हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या महिला लैंगिक शोषण सहन करत असतात किंवा सहन केलेलं असतं त्यांच्यावर असे आरोप झाले तर त्यांना आणखी किती सहन करावं लागतं. एवढंच नाही तर कोर्टाने हे निरीक्षणही नोंदवलं आहे की चांगल्या घरातला माणूस, उच्चभ्रू व्यक्ती यादेखील ‘सेक्शुअल अब्युजर’ असू शकतात.