Beetroot : रोगप्रतिकार शक्ती अन् चेहऱ्यावरील ग्लोसाठी ठरतो परिणामकारक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरड्या त्वचेवर रामबाण प्रभाव पडणारं बीटरुट (Beetroot) हे मुख्य फळ म्हणून ओळखलं जातं. याच कारणामुळे बीटरुटचा ज्यूस (Beetroot Juice) थंड हवामानात सर्वात जास्त पिला जातो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा बरीच कोरडी पडते. अशावेळी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा स्थितीत त्वचेतील ओलावा (Beetroot skin care tips) टिकवून ठेवणं गरजेचं असतं. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी बीटरुटशी संबंधित खास स्किन केअर रूटीन टिप्स सांगणार आहोत. (Immunity will be boosted by drinking the Beetroot juice of also pink glow will come on the face)

ADVERTISEMENT

बीटमधील पोषक तत्वे :

बीटरुटमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅरोटीनॉइड्स, ग्लाइसिन, बेटेन, फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह असे अनेक पोषक घटक आढळतात.

हे वाचलं का?

चेहऱ्यावर बीटरूट कसे लावायचे?

1- तुम्ही हे क्लिंझरसारखे लावू शकता. तुम्हाला फक्त त्याचा रस काढून चेहऱ्यावर लावायचा आहे, त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल

2-तुम्ही बीटरूटला फेस मास्क म्हणून देखील लावू शकता. यासाठी तुम्ही १ चमचा बीटरूटचा रस आणि संत्र्याची पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे चेहऱ्याला गुलाबी चमक येईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

3-तुम्ही बीटरूटनेही चेहऱ्याला मसाज करू शकता. तुम्हाला फक्त एक चमचा कच्च्या दुधात बदामाचे तेल आणि बीटरूटचा रस मिक्स करायचा आहे. आता ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुधारेल.

आरोग्यदायी बीटरुट :

4- बीटरूट खाल्ल्याने अॅनिमियापासूनही आराम मिळतो, कारण त्यात पुरेशा प्रमाणात लोह आढळते, जे रक्ताची कमतरता पूर्ण करण्याचे काम करते. बीटरूट लाल रक्त पेशी सक्रिय करण्यास आणि शरीरात त्यांची संख्या वाढविण्यास मदत करते.

टीप : अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT