RPI मोदी सरकारसोबत असताना राज ठाकरे यांची गरजच काय?: आठवले

मुंबई तक

विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘राज ठाकरे यांना NDA मध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई (RPI) मोदी सरकारबरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय?’ असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ‘राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘राज ठाकरे यांना NDA मध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई (RPI) मोदी सरकारबरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय?’ असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

‘राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे. हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही.’ असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे.

पाहा रामदास आठवले यांनी आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर केली टीका:

रामदास आठवले हे आज (5 मे) सोलापूर दौर्‍यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. मध्येच राज ठाकरे यांनी मशिदीवरील स्पीकर काढावेत त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका घेतली आहे. हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp