Shraddha Walker: श्रद्धाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं होतं?
Shraddha Walker Murder Case: दिल्ली: पोलिसांनी श्रद्धा वालकर (shraddha walker) मर्डर केसच्या तपासात रात्रंदिवस एक केले. त्यानंतर निर्धारित वेळेत म्हणजेच 75 दिवसांत 6 हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात (session court) दाखल करण्यात आले. यादरम्यान ही गोष्टही समोर आली की, घटनेच्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी काय घडले? त्या दिवशी श्रद्धा आणि आफताबमध्ये असे काय घडले की […]
ADVERTISEMENT

Shraddha Walker Murder Case: दिल्ली: पोलिसांनी श्रद्धा वालकर (shraddha walker) मर्डर केसच्या तपासात रात्रंदिवस एक केले. त्यानंतर निर्धारित वेळेत म्हणजेच 75 दिवसांत 6 हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात (session court) दाखल करण्यात आले. यादरम्यान ही गोष्टही समोर आली की, घटनेच्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी काय घडले? त्या दिवशी श्रद्धा आणि आफताबमध्ये असे काय घडले की त्याने आपल्या श्राद्धाची हत्या केली. त्याने केवळ खूनच केला नाही तर निर्दयीपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. चला जाणून घेऊया त्या दिवसाची कहाणी. (What really happened on the day of Shraddha’s murder?)
18 मे 2022 चे सत्य जाणून घेण्यापूर्वी, घटनेच्या एक दिवस आधी काय घडले ते जाणून घेऊया. श्रद्धा आणि आफताबची भेट बंबल या सोशल आणि डेटिंग अॅपद्वारे झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. काही काळाने दोघेही मुंबई सोडून दिल्लीत आले. आफताबची नोकरीही दिल्लीत सुरू होती.
17 मे 2022
दिल्लीत आल्यानंतरही ते अॅप श्रद्धाच्या मोबाइलमध्ये होते. ती अजूनही वापरत होती. दरम्यान, त्या अप्लिकेशनद्वारे तिची हरियाणातील गुरुग्राम येथे राहणाऱ्या एका व्यक्तीशी ओळख झाली. ही एकमेव व्यक्ती होती, ज्याला भेटण्यासाठी श्रद्धा 17 मे 2022 रोजी गुरुग्रामला गेली होती. त्या दिवशी सकाळीच ती घरातून निघून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा त्या नवीन मित्राला भेटण्यासाठी पहिल्यांदा गुरुग्रामला गेली होती.
18 मे 2022
गुरुग्रामला गेल्यानंतर त्या संध्याकाळी श्रद्धा घरी परतली नाही. श्रद्धा कुठे गेली, अशी आफताबला काळजी वाटत होती. मोबाईलवरही ती उत्तर देत नव्हती. त्यामुळे आफताब रात्रभर अस्वस्थ होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा छतरपूरच्या फ्लॅटवर परतली.पोलिसांना 18 मेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे, ज्यामध्ये श्रद्धा फ्लॅटमध्ये शिरताना दिसत आहे. फ्लॅटच्या आत शिरताच आफताब समोर आला. तो आधीच रागावला होता. श्रद्धाला पाहताच आफताबला राग आला आणि त्याने रात्रभर कुठे होतीस आणि तू रात्री परत का आली नाहीस? असा प्रश्न विचारला.