समजून घ्या : पावसाळ्यात देण्यात येणारे रेड-ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
पावसाळा आला, किंवा कुठलं वादळ जरी येणार असलं तरी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलंय, असं आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो, पण हा रेड-ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? त्याने नेमकं काय होतं? असा अलर्ट दिल्यावर आपण काय करायचं असतं, हेच आज थोडक्यात समजून घेऊयात… हवामान विभाग वातावरणातील बदलांवर लक्ष ठेऊन असतं. वारे किती वेगाने वाहतायत, वादळ कुठल्या […]
ADVERTISEMENT
पावसाळा आला, किंवा कुठलं वादळ जरी येणार असलं तरी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलंय, असं आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो, पण हा रेड-ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? त्याने नेमकं काय होतं? असा अलर्ट दिल्यावर आपण काय करायचं असतं, हेच आज थोडक्यात समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
हवामान विभाग वातावरणातील बदलांवर लक्ष ठेऊन असतं. वारे किती वेगाने वाहतायत, वादळ कुठल्या दिशेने सरकतंय, कुठे किती पाऊस पडणार आहे? अशा हवामानातील बदलांवर ते नजर ठेऊन असतात, आणि कुठल्या भागात अतिवृष्टी होणार आहे, कुठे वादळ येणार आहे, कुठे नैसर्गिक आपत्ती ओढावणार आहे, त्यानुसार अलर्ट जारी केले जातात. या अलर्टनुसार डिसास्टर मॅनेजमेंट टीम कामाला लागते…मदत आणि पुनर्वसन विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात, आणि त्यानुसार कामाला सुरूवात होते.
एखाद्या जिल्ह्यात-राज्यात अतिवृष्टी, अतिमुसळधार पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावणार असेल, त्यानुसार अलर्ट जारी करण्यात येतो.
हे वाचलं का?
कोणकोणते अलर्ट दिले जातात, त्याचा नेमका अर्थ काय?
ADVERTISEMENT
रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, यलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट असतात.
ADVERTISEMENT
रेड अलर्ट म्हणजे सर्व यंत्रणांनी तातडीने अक्शन घेण्याची गरज असते
ऑरेंज अलर्ट म्हणजे तयार राहा
यलो अलर्ट म्हणजे हवामान बदलावर लक्ष ठेऊन राहा, अपडेट घेत राहा
ग्रीन अलर्ट म्हणजे तो विभाग सेफ झोनमध्ये आहे.
Mumbai Rains: 13 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्टही जारी
कोणत्या अलर्टमध्ये काय होणं अपेक्षित असतं, ते सुद्धा समजून घेऊयात….
1. रेड अलर्ट – हवामानाच्या दृष्टीने अतिधोकादायक परिस्थिती ओढावते, तेव्हा रेड अलर्ट देण्यात येतो. अशावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा, आपात्कालीन विभाग, आरोग्य यंत्रणा, मदत आणि पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, समुद्रकिनारी असमारे तटरक्षक दल, NDRF, SDRF असे प्रमुख विभाग सतर्क राहतात. म्हणजेच मोठी आपत्ती घडल्यास फार नुकसान होऊ नये, या दृष्टीने हे विभाग सर्वतोपरी काळजी घेत असतात. या अलर्टमध्ये सर्व यंत्रणांनी तातडीने अक्शन घेण्याची गरज असते.
रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याचाही धोका असतो, वीजपुरवठाही खंडीत होण्याची शक्यता असते….जी परिस्थिती आपण तौक्ते वादळ, निसर्ग वादळाच्या वेळी कोकणात पाहिली, जसं की वारे 120-130 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहत असतात, झाडं उन्मळून पडतात, वीजेचे खांब कोसळतात, समुद्राला उधाण येतं, अशा परिस्थितीत हा रेड अलर्ट दिला जातो. रेड अलर्टमध्येच खबरदारीसाठी लोकांचं स्थलांतरही करण्यात येतं.
2. ऑरेंज अलर्ट – ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.
इथेही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्याचा धोका असतो. जसं निसर्ग वादळाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान रायगड-रत्नागिरीत झालं, पण मुंबईतही झाडं उन्मळून पडलेली, अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाडं कोसळतात, आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे रेड अलर्टपेक्षा ऑरेंज अलर्ट कमी धोकादायक जरी असला, तरी या अलर्टमध्येही नुकसान होतं, आणि म्हणूनच मी पहिले सांगितलं तसं, ऑरेंज अलर्टमध्येही यंत्रणांना तयारी करून ठेवायला सांगितली जाते.
3. यलो अलर्ट – यलो अलर्ट म्हणजे अपडेटेट राहा, माहिती घेत राहा. यलो अलर्ट असलेल्या भागात धोका रेड-ऑरेंज अलर्टच्या तुलनेत कमी असतो, पण तरीही सतर्क राहणं गरेजंच असतं. हवामान विभाग देत असलेल्या अपडेट्सवर लक्ष ठेवणं अपेक्षित असतं. यलो अलर्ट म्हणजे सध्या तरी त्या भागात कुठलाही धोका नाही, पण निसर्गापुढे कुणाचंही काहीही चालतं नाही, म्हणतात ना तेच…त्यामुळे यलो अलर्ट असला, तरी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावं लागतं.
4. ग्रीन अलर्ट – ग्रीन अलर्ट म्हणजे संबंधित भाग हा अतिवृष्टी, वादळासारख्या परिस्थितीपासून पूर्णत: सुरक्षित आहे, ग्रीन अलर्ट असलेल्या भागासाठी कोणत्याही सूचना, अडवायझरी प्रसिद्ध केली जात नाही.
आता तुम्ही म्हणाल की मग ग्रीन अलर्ट दिलाच का जातो….एकीकडे सुरक्षित पण म्हणायचं आणि दुसरीकडे त्याला अलर्ट असंही नाव द्यायचं असं कसं? तर बघा….पाऊस, वादळासारख्या परिस्थितीत लोक पॅनिक होतात, पटकन घाबरून जातात…अनेक मेसेज व्हायरल होत असतात, खूप बातम्यांचा भडीमार होतो, अशा परिस्थितीत जे भाग सुरक्षित आहेत, त्यांना तशी ग्वाही मिळावी, यासाठी ग्रीन अलर्ट दिला जातो.
हे अलर्ट खासकरून सरकारी यंत्रणांसाठी दिलेले असतात, जेणेकरून अलर्टनुसार संबंधित यंत्रणात त्या-त्या भागात कामाला सुरूवात करू शकते, आणि संभाव्या धोक्यापासून नागरिकांचं संरक्षण करू शकेल.
या अलर्टनुसार यंत्रणा कशा काम करतात?
रेड आणि ऑरेंज अलर्टनुसार
1. नागरिकांचं स्थलांतर
2. शाळा, समारंभांचे हॉलमध्ये सुविधा उपलब्ध केल्या जातात
3. वाहतुकीचे मार्ग बदलले जातात
4. NDRF/SDRF च्या तुकड्या तैनात केल्या जातात
5. कंट्रोल रुममधले कर्मचारी 24 तास काम करतात
6. आरोग्य सुविधा वाढवल्या जातात
7. रेड अलर्टमध्ये नौदल, NDRF, पोलिस यांचे नोडल ऑफीसर कंट्रोल रुममध्ये असतात.
इतकंच नाही तर महापालिकांच्या कंट्रोल रुम या पोलिस, ट्रॅफिक पोलिस, नौदल, हवामान विभाग, मंत्रालय यांच्यासोबत समन्वय ठेऊन असतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT