शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत यांनी दिलं उत्तर
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत सोमवारी झाली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट नेमकी का झाली असावी? या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र […]
ADVERTISEMENT

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत सोमवारी झाली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट नेमकी का झाली असावी? या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतलेली असू शकते. पण या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान याबाबत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? या प्रश्नाचंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी दिलेलं हे उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे.

सत्तेचा मंत्र दिला का?
ही भेट राजकीय होती असंही बोललं जातं आहे त्याबद्दल काय सांगाल? या भेटीत सत्तेचा मंत्र दिला असेल का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ‘सत्तेचा मंत्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच दिला असेल महाराष्ट्रात विरोधी पक्ष ज्या प्रकारे गोंधळ निर्माण करतो आहे किंवा महाविकास आघाडी सरकारच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो आहे तसं त्यांनी केलं तर पुढची शंभर वर्षे त्यांची सत्ता येणार नाही. हे लक्षात ठेवा हा मंत्र शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच दिला असेल’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन लोटस विसरून जा.. ते महाराष्ट्रात होणार नाही आणि पश्चिम बंगालमध्येही होणार नाही. शरद पवारांची भेट यावरून ज्या काही चर्चा रंगल्या आहेत त्यांना काही अर्थ नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.










