जयश्री पाटील यांची याचिका काय होती? ज्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार सचिन वाझे यांना १०० कोटींची वसुली करण्याचा आदेश हा अनिल देशमुख यांनी दिला होता. परमबीर सिंग यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तो लेटरबॉम्ब हाच अनिल देशमुख यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हायकोर्टाने आज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार सचिन वाझे यांना १०० कोटींची वसुली करण्याचा आदेश हा अनिल देशमुख यांनी दिला होता. परमबीर सिंग यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तो लेटरबॉम्ब हाच अनिल देशमुख यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हायकोर्टाने आज हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून राजीनामा दिला आहे. या सगळ्यामध्ये चर्चेत होती ती जयश्री पाटील यांनी केलेली याचिका. आपण जाणून घेऊया या याचिकेत नेमकं काय होतं?
जयश्री पाटील यांच्या याचिकेत नेमकं काय म्हटलं गेलं ?
जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरून अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. परमबीर सिंग यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टाकडे सोपवलं. त्याचवेळी जयश्री पाटील यांनीही या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली.
अॅड. जयश्री पाटील या कोर्टाच्या आदेशानंतर काय म्हणाल्या?










