Andheri By poll : कुणाची सरशी? काय लागणार निकाल?काही तासातच चित्र स्पष्ट
अंधेरी पोटनिवडणूक पार पडली. आता लक्ष लागलं आहे ते निकालाकडे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होईल. साधारण ११ ते ११.३० च्या दरम्यान सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या […]
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणूक पार पडली. आता लक्ष लागलं आहे ते निकालाकडे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होईल. साधारण ११ ते ११.३० च्या दरम्यान सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Andheri by Election Result Live : पहिल्या फेरीचा कल समोर, ऋतुजा लटकेंना किती मतं?
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32 टक्के मतदान झालं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे. एकूण २५६ मतदान केंद्रांवर, ८१ हजार मतदारांनी हक्क बजावला.










