WhatsApp: ‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप आजपासून चालणार नाही, पाहा संपूर्ण लिस्ट
मुंबई: WhatsApp चे नवीन अपडेट आज म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या अपडेटनंतर अनेक स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही. याचा फटका लाखो यूजर्सला बसणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे हे अॅप जुन्या फोन किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करणार नाही. यामध्ये, फोन यूजर्संना फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा त्यांना नवीन फोन घ्यावा लागेल. […]
ADVERTISEMENT

मुंबई: WhatsApp चे नवीन अपडेट आज म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या अपडेटनंतर अनेक स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही. याचा फटका लाखो यूजर्सला बसणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे हे अॅप जुन्या फोन किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करणार नाही.
यामध्ये, फोन यूजर्संना फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा त्यांना नवीन फोन घ्यावा लागेल. पण बर्याच जुन्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट होऊ शकत नाही. त्यामुळे यूजर्संना नवीन फोन घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमुळे केवळ अँड्रॉइड फोनच नाही तर इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनवरही परिणाम होणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर त्यातही 1 नोव्हेंबरनंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही.
जर यूजर्सला WhatsApp वापरणं सुरू ठेवू इच्छित असल्यास, तुमच्या Android फोनमध्ये OS 4.1 किंवा त्यापेक्षा अधिक अपडेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही आयफोन यूजर्स असाल, तर तुमचा आयफोन iOS 10 किंवा त्यापेक्षा अधिक व्हर्जन असलेला हवा. KaiOS 2.5.0 किंवा नवीन OS वरही, WhatsApp पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.