सलमान खानचा Much Awaited ‘राधे’ सिनेमा कुठे बघाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सलमान खानचा Much Awaited राधे सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आता तुम्ही म्हणाल की थिएटर्स तर बंद आहेत. कोरोना, लॉकडाऊनमुळे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज केला जातो आहे. Zee5 वर हा सिनेमा रिलिज होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून हा सिनेमा स्ट्रीम होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यातली गाणीही हिट झाली आहेत. या सिनेमात सलमान खान, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा, दिशा पाटणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय या सिनेमात मराठमोळा प्रवीण तरडेही झळकणार आहे.

सलमान खान या सिनेमात एका एन्काऊंट स्पेशालिस्टची भूमिका साकारतो आहे. तेरे हिस्सेकी बिर्यानी हम सब मिलकर खाएंगे और बोलेंगे ईद मुबारक हा डायलॉग आणि एक बार जो मैने कमिटमेंट कर ली तो फिर मै अपने आप की भी नहीं सुनता हे डायलॉग ऑलरेडी हिट झाले आहेत. १४ मे रोजी रमजान ईद आहे. रमजान ईद आणि सलमानचा सिनेमा हे गेल्या काही वर्षांमधलं समीकरणच झालं आहे. त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या रिलिजची चांगलीच चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे.

सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी कुठे कुठे पाहता येणार राधे ?

13 मे ला विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा ‘राधे ‘ सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवर रिलीज होणार आहे. ‘पे पर व्हू’ या फॉरमॅटमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. म्हणजेच प्रत्येकवेळी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. Zee5 अ‍ॅपवर हा सिनेमा मे ला दुपारी १२ वाजता रिलीज होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT