कोण आहेत MCA चे नवे अध्यक्ष अमोल काळे? देवेंद्र फडणवीसांशी काय आहे नातं?
अमोल काळे हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात चर्चिलं जातंय. त्याला कारण आहे एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक. अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष बनलेत. त्यामुळे काळे कोण आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमका काय संबंध? अशी चर्चा केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे अमोल काळे पहिल्यांदा चर्चेत आले नाही. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचं […]
ADVERTISEMENT

अमोल काळे हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात चर्चिलं जातंय. त्याला कारण आहे एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक. अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष बनलेत. त्यामुळे काळे कोण आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमका काय संबंध? अशी चर्चा केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे अमोल काळे पहिल्यांदा चर्चेत आले नाही. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं.
एमसीए निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनल कडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्यापासूनच त्यांच्याभोवती चर्चा सुरू झाली होती. विशेषतः देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची जवळीक असल्याचं सातत्यानं सांगितलं जातंय.
MCA President : नागपूरकर अमोल काळे
अमोल काळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते मूळचे नागपूरचे आहेत. नागपुरातील अभ्यंकर नगर येथे राहतात. अमोल काळे यांचा मुख्य व्यवसाय ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय आहेत.
अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सुद्धा जवळचा संबंध आहे.