Mumbai Cruise Drugs Party: ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान आहे तरी कोण?
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. अत्यंत हायप्रोफाईल केसमध्ये एनसीबीने केलेल्या या कारवाईने बरीच खळबळ माजली आहे. शाहरुख खानचा मुलगा या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याने आता त्याच्याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. […]
ADVERTISEMENT
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. अत्यंत हायप्रोफाईल केसमध्ये एनसीबीने केलेल्या या कारवाईने बरीच खळबळ माजली आहे. शाहरुख खानचा मुलगा या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याने आता त्याच्याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. तो नेहमीच स्वतःला लाइमलाईटपासून दूर ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर आता हाच आर्यन प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामुळे जाणून घेऊयात आर्यनबाबत सविस्तरपणे.
शाहरूख आणि गौरी या दाम्पत्याला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. त्यापैकी आर्यन हा शाहरूख आणि गौरीचं पहिलं अपत्य. नवी दिल्ली येथे 13 नोव्हेंबर 1997 रोजी आर्यनचा जन्म झाला.
हे वाचलं का?
इतर स्टार किड्सप्रमाणेच आर्यनचं विदेशात शिक्षण झालं आहे. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात आर्यनने उच्चशिक्षण घेतलं. कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे. आर्यनला लहानपणापासूनच मार्शल आर्टमध्ये रुची असल्याने त्याने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला होता.
शाहरुखचा मुलगा हा अद्याप तरी सिनेसृष्टीत फारसा दिसत नसला तरीही त्याने काही सिनेमांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम केलं आहे.
ADVERTISEMENT
2001 मध्ये आलेल्या ‘कभी खुशी, कभी गम’ या चित्रपटात तो दिसला. शाहरुख खानच्या लहानपणाचा रोल त्याने या सिनेमात केला होता. त्यानंतरही ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटातही त्याने सॉकर खेळाडूचा रोल केला होता. मात्र नंतर हा सीन कापण्यात आल्याचं म्हटलं जातं.
ADVERTISEMENT
2004 मध्ये आलेल्या ‘हम लाजवाब है’ या सिनेमात त्याने ‘तेज’ या पात्रासाठी डायलॉग रेकॉर्ड केले होते. त्यासाठी त्याला बेस्ट डबिंग चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कारही मिळालेला आहे. ‘द लायन किंग’मध्ये त्याने सिंबा या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे. तर याच सिनेमात शाहरुख खानने मुफासा या पात्रासाठी आवाज दिला होता.
Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील
आर्यन अद्याप कोणत्याही चित्रपटात लिड रोलमध्ये दिसलेला नसला तरी करण जोहर त्याला लाँच करणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. आर्यनच्या जन्मावेळी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख खानने माझा मुलाने ते सगळं केलं पाहिजे मी जे माझ्या लहानपणात करू शकलो नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यात शाहरुखने ड्रग्जचाही उल्लेख केला होता हे विशेष.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT