80 हजार कोटींची संपत्ती असणारे सायरस मिस्त्री कोण आहेत ज्यांना रतन टाटांनी उत्तराधिकारी केलं होतं?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक सायरस मिस्त्री यांचा मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघर येथे अपघातात मृत्यू झाला आहे. वयाच्या 54 वर्षी त्यांचं निधन झालं. कसं होतं त्यांचं एकूण आयुष्य? उद्योग क्षेत्रातील कुटुंबात जन्म झालेले सायरस मिस्त्री हे नंतर टाटा समूहाशी कशे जोडले गेले? त्यांना अध्यक्षपदावरून का पायउतार व्हावं लागलं? या सगळ्या गोष्टींवर […]
ADVERTISEMENT
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक सायरस मिस्त्री यांचा मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघर येथे अपघातात मृत्यू झाला आहे. वयाच्या 54 वर्षी त्यांचं निधन झालं. कसं होतं त्यांचं एकूण आयुष्य? उद्योग क्षेत्रातील कुटुंबात जन्म झालेले सायरस मिस्त्री हे नंतर टाटा समूहाशी कशे जोडले गेले? त्यांना अध्यक्षपदावरून का पायउतार व्हावं लागलं? या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट.
ADVERTISEMENT
सुरुवातीचं शिक्षण मुंबईत तर पदवीचं शिक्षण लंडनला
4 जुलै 1968 साली मिस्त्री कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पूर्वीपासूनचं मिस्त्री कुटुंब हे उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध होते. सायरस मिस्त्री यांच्या वडिलांचे नाव पालोनजी मिस्त्री, त्यांच्या आईचे नाव पॅटसी पेरिन दुबाश, जे आयर्लंडच्या होत्या. विधिज्ञ क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या छागला कुटुंबातील रोहिका छागला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सायरस मिस्त्री यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबई येथे झालं. नंतर लंडन येथून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. नंतर लंडन येथूनच बिजनेस स्कुलमधून त्यांनी व्यवस्थपणाचं शिक्षण घेतलं.
हे वाचलं का?
1930 साली मिस्त्रींनी टाटाचे 18.5 टक्के शेअर्स घेतले होते
हे झालं शिक्षणाबाबतीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील व्यवसायात ते काम पाहू लागले. शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले. बांधकाम क्षेत्रात या कंपनीचं मोठं नावलौकिक आहे. मोठ मोठे टॉवर, पूल, बंदरे बांधण्यात त्यांच्या कंपनीने विक्रम प्रस्थापित केले आहे. शापूरजी मिस्त्री जे सायरस मिस्त्री यांचे आजोबा होते त्यांनी 1930मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला होता. त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5% हिस्सा खरेदी केला होता. द इकॉनॉमिस्टने भारत आणि इंग्लंडचे महत्वपूर्ण उद्योगपती म्हणून त्यांचा उल्लेख केला होता.
ADVERTISEMENT
2012 साली टाटा समूहाचे अध्यक्ष झाले
ADVERTISEMENT
इथून मिस्त्री कुटुंबाचं टाटाशी संबंध आला. 2006 साली वडिलांच्या निवृत्तीनंतर सायरस मिस्त्री हे टाटा समूहाच्या बोर्डावर आले. त्यानंतर टाटाचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या. त्यादरम्यान विविध नावे टाटा समूहाच्या चेअरमनपदासाठी पुढे आले होते. 2012 साली टाटा समूहाचे ते सहावे चेअरमन झाले. टाटा आडनावा व्यतिरिक्त चेअरमन होणारे सायरस मिस्त्री हे दुसरे चेअरमन ठरले. यादरम्यान एका वर्षातचं त्यांना संपूर्ण टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. सायरस मिस्त्री यांच्या बहिणीचा विवाह रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नवल टाटा यांच्याशी झाला. त्यामुळे सायरस मिस्त्री हे टाटा कुटुंबीयांशी संबंधित होते.
2016 साली सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले
इतक्या मोठ्या टाटा समूहाचे अध्यक्ष झाल्याने ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. मात्र काही अंतर्गत कारणामुळे त्यांना 2016 साली अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले. नेमकं त्यांना काढण्याचे अधिकृत कारण समोर आले नाही. मात्र अंतर्गत अशी चर्चा होत असे की, सायरस मिस्त्री हे कोणताही निर्णय घेताना टाटा समुहाच्या सदस्यांशी आणि संचालकांशी चर्चा न करता घेत असे. त्यामुळे बोर्डाच्या सदस्यांनी रतन टाटा यांना पुन्हा अध्यक्ष केले.
सायरस मिस्त्रींची न्यायालयात धाव
अध्यक्ष पदावरून पायउतार केल्याने या निर्णयाच्या विरोधात सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात धाव घेतली. हा प्रकरण बराच काळ न्यायालयात चालला. न्यायालयचा निकाल टाटांकडून लागला. नंतर टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून 2017 साली नटराजन चंद्रशेखरण यांची निवड झाली.
80 हजार कोटींची संपत्ती
असं बोललं जात की इंग्लड आणि भारतातील उद्योग क्षेत्रात सायरस मिस्त्री यांचं मोठं नाव आहे. त्यांच्या कंपनीचे 50 हजार कर्मचारी 50 देशात काम करतात. 10बिलियन म्हणजे 70 ते 80 हजार कोटींपेक्षा जास्त त्यांचं नेटवर्थ होतं. इतक्या मोठ्या उद्योगपतीचे आज कार अपघातात जाण्याने उद्योग क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT