मुंबईची खबर: आता 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत... तब्बल 9 वर्षांनंतर 'या' कॉरिडोरच्या कामाला सुरूवात होणार!

मुंबई तक

मागील 9 वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलीबाग कॉरिडोरचं काम लवकरच सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

आता 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत...
आता 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत होणार!

point

तब्बल 9 वर्षांनंतर 'या' कॉरिडोरच्या कामाला सुरूवात...

Mumbai News: मागील 9 वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलीबाग कॉरिडोरचं काम लवकरच सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने पुन्हा एकदा या 126 किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच लवकरच टेंडर मागवलं जाणार आहे. गेल्या महिन्यात, प्रोजेक्टचा पहिला टप्पा बील्ड ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (BOT) अंतर्गत बांधण्याच्या MSRDC च्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर, महामंडळाकडून कामाला सुरूवात करण्यात आली होती. 

4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत...

बीओटी (BOT) अंतर्गत असणाऱ्या या प्रोजेक्टच्या कामासाठी महामंडळाने सरकरकडे रिपोर्ट्स पाठवले आहेत. या रिपोर्टला मंजूरी मिळताच, विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी बीओटी सिस्टिमचा वापर करून टेंडर मागवले जातील. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे विरार आणि अलिबागमधील 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, टोलमधून प्रकल्पाचा खर्च वसूल झाल्यानंतर रस्ता सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. 

हे ही वाचा: Govt Job: 'प्रसार भारती'मध्ये निघाली नवी भरती! 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज...

2016 मध्ये पहिल्यांदा प्रकल्पाचा डीपीआर

2016 मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. यासाठी बऱ्याचदा निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु कोणत्याही कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या टेंडरवर कंपन्यांनी 36 टक्क्यांपेक्षा अधिक बोली लावली होती. या समस्येचं निराकरण करण्यासाठी, एमएसआरडीसीने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारने कोटी रुपयांची बँक हमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ही रक्कम प्रोजेक्टसाठी जमीन मिळवण्यासाठी खर्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

दोन टप्प्यांमध्ये कॉरिडोरची निर्मिती

126 किमी लांब कॉरिडोरची दोन टप्प्यांमध्ये निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत, पालघरच्या नवघर येथून पेणच्या बलावली दरम्यान 96.410 किमी लांबीचा मार्ग बनणार आहे. हा मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर, एमएमआरच्या कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग एनपीटी, नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा हायवे, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतूशी कनेक्ट केला जाणार आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp