कोण आहेत जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुखांना द्यावा लागला राजीनामा
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करुन संबंधित आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली होती. ज्यावर आज (५ एप्रिल) हायकोर्टाने निर्णय देताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमाववं लागलं. पण […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करुन संबंधित आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली होती. ज्यावर आज (५ एप्रिल) हायकोर्टाने निर्णय देताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
कोर्टाच्या या आदेशानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमाववं लागलं. पण या सगळ्यात जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण याविषयी बरीच चर्चा सुरु झाली आहे. आता त्याचबाबत आम्ही आपल्या सविस्तर माहिती देणार आहोत.
जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?
जयश्री पाटील या पेशाने स्वत: एक वकील आहेत. पण त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या स्वातंत्र्य सेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. एल. के. पाटील हे भारताच्या घटनात्मक समितीचे सदस्य देखील होते. त्यामुळे मुळातच जयश्री पाटील यांना लहानपणापासून कायद्याविषयी अनेक गोष्टी ठाऊक होत्या. यातूनच कायद्याचं शिक्षण घ्यावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी लॉमध्ये पीएचडी देखील केली.
पीचएडी केल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली. तेव्हापासून आजवर गेली अनेक वर्ष जयश्री पाटील या कोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. याशिवाय त्यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून देखील काम केलं आहे. जवळजवळ सात वर्ष त्या या पदावर होत्या.










