नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप केलेला काशिफ खान कोण आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे काशिफ खान. काशिफ खान याने क्रूझ पार्टी आयोजित केली होती. समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले. एवढंच नाही तर काशिफ खानचा एक व्हिडीओही नवाब मलिक यांनी पोस्ट केला. हा व्हीडिओ क्रूझवरचा आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या व्हीडिओमध्ये काशिफ खान त्याच्या गर्लफ्रेंडसोबत नाचताना दिसतो आहे. आपण जाणून घेणार आहोत कोण आहे काशिफ खान.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार प्रभाकरचे समीर वानखेडेंवर आरोप, नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

कोण आहे काशिफ खान?

हे वाचलं का?

काशिफ खान हा फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी, अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर आहे. काशिफ खानचा जन्म 6 जून 1983 ला हैदराबादमध्ये झाला. मात्र तो मुंबईतल्या बांद्रा भागात लहानाचा मोठा झाला आहे. kashiffkhan.in या त्याच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. शाळा अर्धवट सोडल्यानंतर काशिफ खानने सिम कार्ड विकण्यापासून ते पेपर विकेपर्यंत सगळ्या प्रकारचे व्यवसाय दक्षिण मुंबई भागात केले. त्यानंतर त्याचा प्रवेश ग्लॅमर जगतात आला.

LinkedIn ने दिलेल्या माहितीनुसार तो फॅशन शो देखील अरेंज करत होता. हळूहळू तो फॅशन जगताकडे वळला आणि फॅशन टीव्ही इंडियाचा MD ही झाला. फॅशन आयकॉन म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. एक लेखक, स्टार्ट अप स्पेशालिस्ट अशीही त्याची ओळख आहे. व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळवून देण्याचं कामही तो करत होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नवाब मलिकांनी काय आरोप केले आहेत?

क्रूझवरील पार्टी फॅशन टीव्ही इंडियाच्या काशिफ खान यांनी आयोजित केली होती. त्यांची चौकशी केली, तर अनेक लोकांचे खरे चेहरे समोर येतील असा खळबळजनक आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मलिक यांनी केलेले आरोप काशिफ खानने इंडिया टुडेशी बोलताना फेटाळून लावले आहेत.

काशिफ खान म्हणाले, ‘फॅशन टीव्ही इंडियाचा त्या क्रूझवर आयोजित कार्यक्रमात प्रायोजक म्हणून सहभाग होता. त्या ठिकाणी मी स्वतः तिकीट खरेदी करून गेलो होतो. क्रेडीट कार्डद्वारे मी जेवण, मद्य आणि रुमचं बिल दिलं. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत’, असं काशिफ खानने सांगितलं.

काशिफ खानने काय उत्तर दिलं आहे?

‘नवाब मलिकांनी केलेले आरोप ऐकून मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटलं. ते एक मंत्री आहेत आणि ताकदवान व्यक्तीही आहेत. मी त्यांचा आदर करतो. ते माझ्यावर असा आरोप करत आहे की, ज्याचं मला आश्चर्य वाटतंय’, असं काशिफ खानने म्हटलं आहे.

‘नवाब मलिक यांनी आधी सर्व पुरावांच्या पडताळणी करावी आणि नंतर बोलावं. माझा कोणत्याही पॉर्न रॅकेट वा ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही’, असंही काशिफ खानने आरोपांवर उत्तर देताना म्हटलं आहे.

‘आर्यन खानला मी क्रूझवर बघितलं नाही. आर्यनला ओळखतही नाही. मी तिथे प्रायोजक म्हणून उपस्थित होतो. तिथे कुणी काय घेतलंय याबद्दल मला काही माहिती नाही. तिथे ड्रग्ज होते की नाही याबद्दलही माहिती नव्हतं’, असंही काशिफ खानने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT