कोण आहेत रोना विल्सन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आणि कार्यकर्ता रोना विल्सन हे बुधवारी हायकोर्टात गेले होते. ‘अर्बन नक्सल केस’ या नावानेनेही ही केस ओळखली जाते. मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणाचा तपास करणारी एजन्सी बदलण्याची मागणी विल्सन यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या केसचा तपास डिजिटल फॉरेन्सिक अनालिसिसमधले तज्ज्ञ असलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिमकडून करुन घेण्याची (SIT) मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. तसंच या टीमचे प्रमुख सुप्रिम कोर्ट किंवा हायकोर्टाचे निवृत्त जज असतील अशी मागणी केली आहे.

विल्सन यांनी केलेल्या याचिकेनुसार त्यांच्यासह इतर 15 जणांवर टाकलेली केस हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे टाकण्यात आली आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये हॅक करुन गैर पद्धीतने कागदपत्र टाकणाऱ्या व्यक्तीला शोधण्याची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

जेलमधून सुटका करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे. विल्सन यांनी या पिटिशनमध्ये आर्थिक भरपाईची मागणी केली आहे. अर्बन नक्सल केसमध्ये त्यांची झालेली मानहानी आणि आरोप ज्यात त्यांच्या मूलभूत अधिकारांची झालेली पायमल्ली, त्यांना मिळालेली अमानवी वागणूक, त्यांना झालेला त्रास याची आर्थिक भरपाई करुन देण्याची त्यांची मागणी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुणे पोलिसांकडे असलेला हा केसचा तपास सध्या नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी करत आहे. तो एसआयटीकडे सोपविण्याची मागणी विल्सन यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

विल्सन हे मुळचे केरळाचे आहे जे त्यांना 2018 मध्ये अटक होण्यापूर्वी ते दिल्लीमध्ये राहत होते. त्यांनी दिल्ली जेएनयू मधून एम फिलची डिग्री घेतली आहे. इंग्लंमधील युनिव्हर्सिटीमधून ते पी.एच.डी करत होते. त्यांच्या पी.एचडी च्या थीसीसला दोन युनिव्हर्सिटीमधून मान्यता देण्यात आली होती. विल्सन हे 2018 मध्ये एक स्कॉलरशिपलसाठी अप्लाय करण्याची प्रक्रिया करत होते.

ADVERTISEMENT

तसंच ते राजकीय कैद्यांची सुटका करणाऱ्या समितीचे माध्यम सचिव म्हणून काम करतात. नक्शलींबरोबर असलेल्या संबंधांच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या जी.एन.साईबाबा यांच्या लीगलटीमबरोबरही विल्सन हे काम करतात.

विल्सन यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे ज्यानुसार त्यांच्यासह इतरांवर करण्यात आलेले आरोप हे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारीत आहेत जे बुहादा त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि कॉम्प्युटरवरुन घेण्यात आले आहेत असं त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.
पुणे पोलिसांच्या म्हणण्युसार 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणं देण्यात आली. ज्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्याच्या आसपास दंगल उसळली. यात अटक केलेले काही आरोपींचे माओवादी संघटनेशी संबंध असल्याचं तपासात आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

असं असलं तरी विल्सन यांचं म्हणणं आहे की त्यांनी पुण्यात कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही किंवा कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी झाले नव्हते. तपास करणाऱ्यांनी विल्सन आणि इतर आरोपी पंतप्रधानांच्या हत्येचा कट करत असल्याचा आरोप केला आहे.

तसंच त्यासाठी काही वेपन्स नेपाळहुन आणण्यासाठी समन्वय करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवादी संघटनेमध्ये ते लोकांना भरती करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसंच पोलिसांबद्दल माहिती देणे आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सामग्रुगी पुरवणं असे आरोप त्यांच्यावर आहेत. माओवाद्यांना हल्ला करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि भूमिगत माओवाद्यांच्या संपर्कात राहणे हे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

विल्सन यांनी त्यांच्यावर केलेले आरोप नाकारले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT