Shinde Vs Thackeray राड्यात विधिमंडळ प्रशासन बुचकळ्यात; नियमांचा पडणार किस

मुंबई तक

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचा (Shivsena) प्रतोद नेमण्यासाठी शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) असा जोरदार संघर्ष सुरु आहे. याच संघर्षामध्ये आता विधिमंडळ प्रशासन नेमकं कोणाला प्रतोद म्हणून मान्यता द्यायची यावरुन बुचकळ्यात पडलं आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती कार्यालयाला आणि प्रशासनाला आता नियमांचा किस पाडूनच पुढील निर्णय घ्यावा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uddhav Thackeray vs Eknath Shinde :

मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचा (Shivsena) प्रतोद नेमण्यासाठी शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) असा जोरदार संघर्ष सुरु आहे. याच संघर्षामध्ये आता विधिमंडळ प्रशासन नेमकं कोणाला प्रतोद म्हणून मान्यता द्यायची यावरुन बुचकळ्यात पडलं आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती कार्यालयाला आणि प्रशासनाला आता नियमांचा किस पाडूनच पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. (Who is Shiv Sena’s chief Whip in Legislative Council? Thackeray or Shinde?)

नेमकं काय घडलयं?

विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे या पत्रात सूचित करण्यात आलं आहे. गट नेते म्हणून शिंदे यांनी हे पत्र दिलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp