Adani FPO Cancelled : 20 हजार कोटींचा FPO रद्द, अदाणींनी सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Adani FPO News : अदाणी समूहाची प्लॅगशिप कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) 20,000 कोटी रुपयांचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर अर्थात एफपीओ बुधवारी (1 जानेवारी) मागे घेण्यात आला. प्रचंड प्रतिसाद मिळालेला हा एफपीओ मागे घेण्यात आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामागचं कारणं अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सांगितलं आहे. (why Adani Enterprises calls off FPO, Gautam Adani On Cancelled FPO)

20,000 कोटी रुपयांसाठी हा एफपीओ 27 जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि 31 जानेवारी रोजी सबस्क्रायबर पूर्ण होऊन बंद झाला होता. त्यानंतर अदाणी एंटरप्रायजेसने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला.

अदाणी एफपीओ मागे का घेण्यात आला? (why adani fpo withdrawn)

चर्चेत असलेला अदाणी एफपीओ मागे घेण्यात आल्यानं गुंतवणूकदारही बुचकळ्यात पडले. याबद्दल अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी पूर्णपणे सबस्क्राईब झालेला एफपीओ मागे घेण्याच्या निर्णयाबद्दल गुंतवणूकदारांना माहिती दिलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Adani Group : अदाणी ग्रुपच्या शेअर घसरणीत LIC ला फटका, 18 हजार कोटी…

गौतम अदाणी यांनी म्हटलंय की, एफपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाल्यानंतर मागे घेण्याच्या निर्णयाने लोकांना आश्चर्य वाटलं असेल, पण काल बाजारात झालेली चढ-उतार बघता बोर्डाला हे जाणवलं की, एफपीओसोबत पुढे जाणं नैतिकपणे योग्य ठरणार नाही.

ADVERTISEMENT

अदाणी यांनी पुढे असंही म्हटलंय की, शेअर बाजारातील हालचाली आणि मार्केटमध्ये होत असलेला चढउतार बघता कंपनीचं उद्दिष्ट आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं हेच आहे. त्यामुळे आम्ही एफपीओमधून मिळालेली रक्कम परत करत आहोत आणि याच्याशी झालेली देवाण-घेवाण संपवत आहोत, असं अदाणी यांनी म्हटलं आहे.

Adani: अदानींना कोट्यवधींचा फटका देणारा Hindenburg Report आहे तरी काय?

ADVERTISEMENT

गुंतवणूकदारांनी मला साथ दिली -गौतम अदाणी

गौतम अदाणी यांनी गुंतवणुकदारांना उद्देशून म्हटलं आहे की, एक उद्योजक म्हणून माझ्या 4 दशकांहून अधिकच्या काळात मला गुंतवणुकदारांकडून मोठी साथ मिळाली आहे. मी आयुष्यात जे काही थोडंफार मिळवलं आहे, ते गुंतवणुकदारांचा विश्वासाच्या बळावरच, हे मान्य करणं महत्त्वाचं आहे. मी माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांना देतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Gautam Adani: कोण आहे गौतम अदाणींची सून, काय करते काम?

FPO : एफपीओ म्हणजे काय?

फॉलो-ऑन-पब्लिक ऑफर (FPO) ला सेंकडरी ऑफरिंग म्हणूनही ओळखलं जातं. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट कंपनी असलेल्या भाग धारकांसोबत नव्या गुंतवणुकदारांसाठी शेअर खुले करते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT