Pune : जगताप यांच्या बायकोला तिकीट, मग टिळकांच्या घराला भाजपनं का नाकारलं?
Kasba Peth and Chinchwad bypoll : पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. भाजपने कसबा पेठ आणि चिंचवडसाठी एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केले. मात्र लोकप्रतिनिधीच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत कुटुंबातल्या व्यक्तिला उमेदवारी देण्याची राजकीय परंपरा भाजपने चिंचवडमध्ये पाळली पण कसब्यात का नाही? अशी चर्चा आता होऊ लगाली […]
ADVERTISEMENT
Kasba Peth and Chinchwad bypoll :
ADVERTISEMENT
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. भाजपने कसबा पेठ आणि चिंचवडसाठी एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केले. मात्र लोकप्रतिनिधीच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत कुटुंबातल्या व्यक्तिला उमेदवारी देण्याची राजकीय परंपरा भाजपने चिंचवडमध्ये पाळली पण कसब्यात का नाही? अशी चर्चा आता होऊ लगाली आहे. (why bjp give candidate hemant rasane for kasba peth assembly bypoll instead of mukta tilak family?)
टिळक कुटुंबामध्ये उमेदवारी नाही :
भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने पती शैलेश टिळक किंवा त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी न दिल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली. याशिवाय कसब्यात टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने थेट ‘ब्राम्हण समाजावर अन्याय होतोय’ असं सांगणारे बॅनर झळकले.
हे वाचलं का?
“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब
भाजपने चिंचवडमध्ये कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय का घेतला आणि कसब्यामध्ये कुटुंबाबाहेर आणि जातीबाहेर उमेदवारी का दिली हा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
अश्विनी जगताप यांना तिकिट देण्याचा निर्णय भाजपने का घेतला?
-
लक्ष्मण जगताप यांचा प्रभाव कायम रहावा :
ADVERTISEMENT
तब्बल २० वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक, महापौरपद भुषवलेल्या जगतापांनी २०१७ साली राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिका भाजपकडे खेचून आणली होती. जगतापांचा हा प्रभाव आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने रहावा या हेतूने अश्विनी जगताप यांना इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जगतापांची राजकीय यंत्रणा अश्विनी जगताप यांच्या बाजूने उभी राहिल हा विचार भाजपने केल्याचं बोललं जातं आहे.
-
लक्ष्मण जगातप यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले चांगले संबंध :
या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपने प्रयत्न केले. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला निवडणुकीचं तिकिट देण्याचा निर्णय भाजपने घेतला, त्याला सर्वपक्षीय राजकारणातला जगतापांचा राहिलेला वावर हे देखील एक कारण असू शकतं. लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा पक्षांबरोबर काम केलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीमध्ये गेले.
याशिवाय २०१४ मध्ये जगताप यांनी मनसे आणि शेकापच्या लोकसभा पाठिंब्यावर लढवली होती. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांशी कधी न् कधी जोडले गेल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वावर राहिला आहे. जगतापांना सहकार्य करणारे, त्यांच्याशी ऋणानुबंध असलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांचा पाठिंबा यानिमित्ताने भाजपच्या उमेदवाराला मिळेल यासाठीही अश्विनी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं.
भाजपमध्ये गेल्यानंतही लक्ष्मण जगताप यांचे राष्ट्रवादीच्या अजितदादांशी जवळचे संबंध होते. हे देखील इथे विसरता कामा नये. याच चिंचवड पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादी निवडणूक लढवत असल्याने कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास लक्ष्मण जगतापांशी पवारांचे असलेले जुन्या संबंधांची मदत होईल हाही हेतू यामागे असावा.
-
सहानुभुतीचा फॅक्टर :
याव्यतिरिक्त पोटनिवडणुकीमध्ये सहानुभुतीचा फॅक्टर काही टक्के काम करतो. त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा यादृष्टीनेही शंकर जगताप यांच्याऐवजी अश्विनी जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचं बोललं जातंय.
Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान
मग कसबा पेठेतून टिळकांना उमेदवारी का नाही?
-
जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मतदानाची टक्केवारी :
कसबा हा भाजपचा बालेकिल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोतीबागेत असलेलं कार्यालय आणि त्यामुळे तिथे असलेलं RSS चं वर्चस्व. कसब्यातल्या राजकारणात पेठांचा मतदार दुर्लक्षित करुन चालत नाही. कसबा पेठ हा अनेक वर्षांपासून ब्राम्हण बहुल मतदारांचा मतदारसंघ. हाच भाजपचा पारंपारिक मतदारही राहिलाय. असं असलं तरीदेखील आता तिथली वस्ती म्हणजे मतदारांची डेमोग्राफी बदली आहे.
कसबा पेठेतील मतदारांची अंदाजे आकडेवारी :
-
ब्राह्मण – ४० हजार
-
मराठा – ४० हजार
-
इतर मागासवर्गीय – १ लाख
-
मुस्लिम – ३५ हजार
-
जैन/मारवाडी – २० हजार
-
दलित (मातंग) – २० हजार
-
इतर – १५ हजार
हाच विचार करुन हेमंत रासने या ओबीसी समाजातल्या व्यक्तिला इथे उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असण्याची शक्यता आहे.
-
कुटुंबाला राजकीय वारसा नसणं/ काँग्रेसकडूनही तगडा उमेदवार :
मुक्ता टिळक यांची कसब्यातली आमदार म्हणूनची कारकिर्द फार मोठी नाही. तसंच त्यांच्या कुटुंबातले त्यांचे पती शैलेंद्र टिळक हे राजकारणात सक्रिय नाहीत. तर त्यांचा मुलगा कुणाल टिळक हा राजकारणात फारसा सक्रिय नाही. याआधी हे दोघेही पिता- पुत्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. त्यांना निवडणुकीच्या रिंगणाचा अनुभव नसल्याने आणि नगरसेवक आणि विधानसभेची निवडणूक लढवणारे रविंद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भाजपने रिस्क घेणं टाळलं.
-
निवडणूक जिंकण्यासाठी लागणारं कसब :
कसब्यामध्ये रविंद्र धंगेकर हे स्थानिक पातळीवर रस्त्यावर उतरुन काम करणारे नेते किंवा कार्यकर्ते आहेत. पुण्यात गणेशोत्सव मंडळात त्यांच्या असलेल्या ओळखी आणि नेटवर्क असंच काहीसं नेटवर्क हेमंत रासने यांचंही असल्याने गणेशोत्सव मंडळातील नेटवर्कचा फायदा मतांमध्ये व्हावा यासाठी हा निर्णय भाजपने घेतल्याचं बोललं जातं आहे.
आता ब्राम्हण समाजातील व्यक्तिला वगळून कसब्यात दिलेली उमेदवारी भाजपला फायद्याची ठरते का आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत शंकर जगताप यांच्या निमित्ताने घरातच दुखावलेल्या व्यक्तीमुळे मतदानावर परिणाम होतो का याची उत्तर आपल्याला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच मिळू शकतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT