MCA Election : राजकीय नेत्यांना ‘एमसीए’मध्ये इतका रस का? काय आहे ‘अर्थ’कारण?

मुंबई तक

२० ऑक्टोबरला ‘एमसीए’ची अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai cricket association) निवडणूक होतेय. ही निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडी बातम्यांचा विषय ठरल्यात. याच कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढणारे सत्ताधारी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र आलेत. त्यामुळे राजकारण्यांना ही क्रिकेटच्या मैदानातील ‘एमसीए’च्या निवडणुकीत इतका रस कशासाठी? या निवडणुकीत जिंकून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२० ऑक्टोबरला ‘एमसीए’ची अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai cricket association) निवडणूक होतेय. ही निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडी बातम्यांचा विषय ठरल्यात.

याच कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढणारे सत्ताधारी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र आलेत. त्यामुळे राजकारण्यांना ही क्रिकेटच्या मैदानातील ‘एमसीए’च्या निवडणुकीत इतका रस कशासाठी? या निवडणुकीत जिंकून त्यांना काय फायदा होणार आहे? हे समजून घेण्यासाठी ‘एमसीए’ अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारण समजून घेणं आवश्यक ठरतं.

बीसीसीआय (The Board of Control for Cricket in India) हे क्रिकेटमध्ये जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखलं जाते. त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए (Mumbai cricket association) ही बीसीसीआयची संलग्न राज्य संघटना आहे. ही संघटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असल्याने एमसीए पैसा आणि ग्लॅमर याबाबतीत बीसीसीआय (The Board of Control for Cricket in India) इतकीच श्रीमंत संघटना आहे.

MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनचं वर्षाला उत्पन्न किती आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल क्रिकेट सामने आणि देशातंर्गत क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून ‘एमसीए’ची (Mumbai cricket association) बक्कळ कमाई होते. त्यामुळेच सोन्याचं अंड देणाऱ्या या कोंबडीवर राज्य करण्यासाठी राजकारणी जिवाचं रान करत असतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp