वेदांता ग्रुपवर माझा विश्वास नाही असं का म्हणाले शरद पवार?
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने या निर्णयावर प्रचंड टीका होते आहे. अशात या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला जाणं हे दुर्दैवी आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर वेदांता ग्रुपचा हा प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात येईलच याची काही शाश्वती नाही […]
ADVERTISEMENT
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने या निर्णयावर प्रचंड टीका होते आहे. अशात या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला जाणं हे दुर्दैवी आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर वेदांता ग्रुपचा हा प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात येईलच याची काही शाश्वती नाही असं म्हणत त्यांनी एक जुनी आठवणही सांगितली आहे. माझा वेदांता ग्रुपवर काही विश्वास नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
वेदांताचा प्रकल्प येईलच याची काही खात्री नाही
वेदांताचा प्रकल्प गुजरातला जाणं हा काही या कंपनीचा पहिला अनुभव नाही. हा प्रकल्प वेदांता ग्रुपचा आहे. त्याचे मालक अग्रवाल यांनी निर्णय घेतला. त्यात काही नाविन्य नाही. या देशात एक महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झाला होता. तो प्रकल्प वेदांता ग्रुपच करणार होता. नंतर ठरवून काही स्थानिक विरोध झाला आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट चेन्नईला गेला. ही जुनी गोष्ट आहे. वेदांताकडून हे पहिल्यांदा झालेलं नाही. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल की नाही याची खात्री मला तरी देता येत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरीतून चेन्नईला गेलेला हा प्रकल्प कुठला?
शरद पवारांनी उल्लेख केलेला वेदांता ग्रुपचा प्रकल्प हा १९९४ मध्ये महाराष्ट्रात येणार होता. हा प्रकल्प स्टर्लाईट कॉपर प्लांटचा होता. महाराष्ट्रातल्या रत्नागिरीत हा प्रकल्प येणार होता. मात्र त्याच वर्षी हा प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेला. हा प्रकल्प स्टरलाईट कॉपर प्लांट १९९४ ला गेला. मात्र तो तिथे गेल्यापासून वादग्रस्त ठरतो आहे.
हे वाचलं का?
काय काय घडलं आत्तापर्यंत
१९९४ ला प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला.
२० मार्च १९९६ ला मच्छिमारांनी स्टरलाइटसाठी कच्चा माल ज्या जहाजातून आणला होता त्या जहाजाला घेराव घातला.
ADVERTISEMENT
१४ ऑक्टोबर १९९६ ला TNPCB ने प्लांट ऑपरेट करण्यास संमती दिली
ADVERTISEMENT
५ जुलै १९९७ ला प्रकल्पातून गॅस लीक झाला. त्यानंतर ९६ महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
२ मार्च १९९९ ला ११ रेडिओ स्टाफला गॅस लीकमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं
२१ सप्टेंबर २००४ ला सुप्रीम कोर्टाच्या देखरेख समितीला कचरा व्यवस्थापन पर्यावरण मानकांचे पालन न केल्याचे आढळून आलं
ऑगस्ट २००५ च्या सुरूवातीला या प्लांटमधलं उत्पादन तिप्पट करण्यात आलं
२८ सप्टेंबर २०१० ला हा प्लांट मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आला
२३ मार्च २०१३ ला मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. त्यानंतर अनेकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
२ एप्रिल २०१३ सुप्रीम कोर्टाने नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी प्लांटला १०० कोटींचा दंड ठोठावला.
१२ फेब्रुवारी २०१८ ला प्लांटच्या विस्ताराच्या अहवालासंदर्भात निषेध सुरू झाला.
९ एप्रिल २०१८ ला TNPCB ने CTO च्या रिन्यूएलला नकार दिला
२२ मे २०१८ ला या प्रकल्पाविरोधात जे आंदोलन सुरू होतं त्याचा 100 वा दिवस होता. पोलिसांच्या गोळीबारात या दिवशी १२ लोक ठार झाले
२३ मे २०१८ ला आणखी एकजण गोळीबारात ठार झाला
२४ मे २०१८ पोलिसांच्या गोळीबारासंदर्भात जगदीशम कमिटी स्थापन करण्यात आली
२८ मे २०१८ हा प्रकल्प कायमचा बंद करण्यात आला.
अशी सगळी या प्रकल्पाची माहिती आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. तसंच या वेदांता या ग्रुपवर आपला विश्वास नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT