राज्य महिला आयोग एकच महिना माझ्या ताब्यात द्या असं का म्हणाल्या तृप्ती देसाई?
फक्त एक महिन्यासाठी महिला आयोगाचं अध्यक्षपद माझ्याकडे द्या कायदा काय असतो मी दाखवून देते असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्या व्यवस्थित काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तृप्ती देसाईंचा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पाठिंबा का? काय […]
ADVERTISEMENT

फक्त एक महिन्यासाठी महिला आयोगाचं अध्यक्षपद माझ्याकडे द्या कायदा काय असतो मी दाखवून देते असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्या व्यवस्थित काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तृप्ती देसाईंचा शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पाठिंबा का?
काय म्हणाल्या आहेत तृप्ती देसाई?
“राज्य महिला आयोगाचं नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग असं केलं पाहिजे. पुढच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाने हा ठराव पास करावा. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम कार्यक्रमांचं उद्घघाटन करणं आणि फित कापत बसणं एवढंच नाही. त्या निर्णय घेऊ शकतात. मात्र रूपाली चाकणकर या तसं काहीही करताना दिसत नाहीत. पक्षातल्या कुणावर काही गुन्हा दाखल झाला की कारवाई करायची. मात्र विरोधी पक्षातलं काही असेल तर फारसं लक्ष द्यायचं नाही असं काम होत नसतं. शरद पवारांना मी विनंती करेन की फक्त एक महिना माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या कायदा काय असतो? सगळ्या गोष्टींमध्ये समानता कशी आणायची? स्त्रियांना त्यांचा हक्क कसा मिळवून द्यायचा हे मी दाखवून देईन.”









