एसटी आंदोलन: गुणरत्न सदावर्तेंचा पाय खोलात, सातारा पोलिसांना का हवा आहे ताबा?
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. ज्यानंतर आज आता पुन्हा एकदा कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. असं असताना आता […]
ADVERTISEMENT

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. ज्यानंतर आज आता पुन्हा एकदा कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. असं असताना आता सातारा पोलिसांनी देखील सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात एक जुना गुन्हा दाखल असल्याने त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा पोलिसांनी सकाळपासूनच फिल्डींग लावली आहे. मात्र कोर्टाने त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली असल्याने तूर्तास तरी सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळू शकणार नाही.
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे गेल्या दोन दिवसापासून पोलीस कोठडीत होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जर कोर्टाने सदावर्तेंची कोठडी फेटाळल्यास सातारा पोलीस त्यांचा ताबा मिळविण्यासाठी सज्ज होते.
साताऱ्यात कोणत्या प्रकरणात सदावर्तेंवर गुन्हा?










