एकनाथ शिंदे गुजरातमध्येच का गेले?; संजय राऊतांनी घेतलं चंद्रकांत पाटलांचं नाव
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल २६ आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये असून, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये का गेले, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव घेत स्फोटक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल २६ आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये असून, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये का गेले, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव घेत स्फोटक विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत मंगलप्रभात लोढा. त्यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. त्यांची पावलं कोणत्या दिशेनं पडताहेत, तुम्ही समजून घ्या. यासाठी फाटाफूट घडवून आणता आहात का. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलं पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान, षडयंत्र आहे. तसं भाकित यापूर्वीच केलं होतं,” असा आरोप राऊत यांनी भाजपवर केलाय.
“शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही, हे परवा उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हटलेलं होतं. त्याचा अर्थ समजून घ्या. शिवसेना निष्ठावंताची सैना आहे.”
‘महाराष्ट्रातून आमदार आलेत, हॉटेलची सुरक्षा वाढवा’; रात्री २ वाजता सुरतमध्ये काय घडलं?
हे वाचलं का?
“सत्तेसाठी आणि पदासाठी स्वतःला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद शिवसेनेत तयार होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले, त्यांची अवस्था आपण बघतोय. ज्यांची नावं मी सातत्यानं पाहतोय. त्यातील बरेचसे आमदार आता वर्षा बंगल्यावर आहेत. त्यांची नावं चुकीच्या पद्धतीनं घेतलीये,” असं म्हणत राऊतांनी काही आमदार शिंदे यांच्यासोबत नसल्याचं म्हटलंय.
“गुलाबराव पाटील, संजय राठोड, प्रताप सरनाईक अशी अनेक नावं मी बघतोय. जे आमदार इथे नाहीत, असं म्हटलं जातंय. त्यात मंत्रीही आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी सांगितलं की, काय झालं ते कळत नाही. पण आम्हाला इथं आणलं आहे. ते आमदार गुजरातमध्ये आहेत. सुरतमध्ये आहेत.”
ADVERTISEMENT
Vidhan Parishad Election : शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर! एकनाथ शिंदे गुजरातमध्ये
ADVERTISEMENT
“या आमदारांची व्यवस्था गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. म्हणजे तुम्हाला मी जे काय सांगतो ते कळलं असेल. त्यांना गुजरातलाच का नेण्यात आलं. त्यांना सुरतमध्येच का ठेवण्यात आलंय. सुरतचे खासदार चंद्रकांत पाटील आहेत. ते प्रदेशाध्यक्ष आहेत. ते कुणाच्या जवळ आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे,” असं राऊत म्हणाले.
“अशा प्रकारे भ्रम, फसवणूक करून आमदारांना नेलं जातंय. ज्याक्षणी आमचा आणि त्यांचा आमचा संपर्क होईल, त्याक्षणी ते परत येतील. अशा प्रकारच्या भूकंपाची भाषा कुणी करत असेल, तर त्यांना सर्वात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल. मगच त्यांना महाराष्ट्र दुबळा करता येईल. आम्ही असेपर्यंत महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही.”
Vidhan Parishad Election: भाजपने १३४ मतं नेमकी कशी मिळवली? कुणाची किती मतं फुटली?
“एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते कालपर्यंत आमच्यासोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी व्हावेत म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत होते. बाहेरच्या मतदारांशी ते संपर्क करत होते. जिवाभावाचे सहकारी आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. जोपर्यंत त्यांचं आणि आमचं बोलणं होत नाही, तोपर्यंत मी त्यांच्याबाबतीत कोणतंही विधान करणार नाही,” असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अधिक बोलणं टाळलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT