मतदारांनी भाजपलाच मतदान का केलं; भाजपच्या मतदाराला कसं आकर्षित करता येईल?
– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्यामागचं कारण म्हणजे त्यांची निवडणुकीतील मेहनत. पण याशिवाय हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि निश्चित मतदारांवर लक्ष्य यांचा एकूण जो काही मिलाफ करण्यात आला तीच गोष्ट भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. खरं म्हणजे या सगळ्याच शक्तिशाली असं हे संयोजनच भाजपला विजयापर्यंत घेऊन गेलं. तुम्हाला हिंदुत्वाच्या […]
ADVERTISEMENT

– प्रशांत किशोर, राजकीय रणनितीकार
भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्यामागचं कारण म्हणजे त्यांची निवडणुकीतील मेहनत. पण याशिवाय हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि निश्चित मतदारांवर लक्ष्य यांचा एकूण जो काही मिलाफ करण्यात आला तीच गोष्ट भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. खरं म्हणजे या सगळ्याच शक्तिशाली असं हे संयोजनच भाजपला विजयापर्यंत घेऊन गेलं.
तुम्हाला हिंदुत्वाच्या बाजूने वैचारिकदृष्ट्या खंबीर व्हावं लागेल. फक्त सॉफ्ट हिंदुत्वावर अवलंबून राहता येणार नाही. तुम्हाला उदारमतवादी हिंदूंना अशा प्रकारे आवाहन करावे लागेल की जेणेकरुन ते उत्तेजित होतील. आणि आकडेवारी देखील हेच सांगते आहे. नेमकी आकडेवारी काय आहे यावर आपण एक नजर टाकूयात.
एकंदरीत भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 38 टक्के मते मिळाली आहेत. यातून जर आपण अल्पसंख्याकांना हटवले आणि आपण फक्त 80 टक्के मतदारांविषयी विचार केला तरी 80 टक्के हिंदूंपैकी भाजपला जवळजवळ 40 ते 50 टक्के हिंदूंची मते मिळत आहेत. त्यावरच त्यांचा विजय निश्चित होतो.