अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना भिवंडीत घडली आहे. भिवंडीतल्या खारबावमध्ये झालेल्या हत्येचा तपास पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला आहे. या घटनेचे फोटो अनेक ठिकाणी व्हायरलही झाले होते. एका माणसाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने संपवलं आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतल्या खारबाव या ठिकाणी असलेल्या जंगलात पोलिसांना 4 जानेवारीला गळा चिरलेल्या अवस्थेत फेकलेला एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तसंच मृत झालेल्या माणसाचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याची ओळख पटते आहे का हे पोलिसांनी पाहिलं. त्यात पोलिसांना यश आलं. कारण मृत इसमाने जो शर्ट घातला होता त्या शर्टवर आयन फॉर मेन्स हे स्टिकर होतं.

हे वाचलं का?

नांदेडमध्ये तरूणाची 20 हजार रूपयांसाठी हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी या टेलरचा शोध घेत घेत फिरदोस मार्केटमध्ये टेलरचं दुकान गाठलं. तिथे पोलिसांना मृत व्यक्तीचं नाव कळलं. मृत माणसाचं नाव सलाहुद्दी मोहम्मद युसुफ असं होतं. हा माणूस धामणकर नाका भागातल्या विठ्ठल नगर भागात राहणारा होता. पोलिसांनी या प्रकरणी अधिक कसून चौकशी केल्यानंतर या माणसाच्या खुनाचं रहस्य उलगडलं.

ADVERTISEMENT

पोलिसांनी ही माहिती दिली आहे की सलाहुद्दी मोहम्मद युसुफच्या पत्नीचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका माणसाशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिला पतीपासून सुटका हवी होती. त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराडे यांनी सांगितलं की जो मृत व्यक्ती आहे त्याला मधुमेह होता. त्या औषध देण्याच्या बहाण्याने त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर खारबाव जवळच्या जंगलात घेऊन गेले. तिथेच त्याचा गळा कापून खून करण्यात आला आणि त्याचा मृतदेह तिथेच फेकून देण्यात आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT