प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्या हद्दीत झालेल्या एका व्यक्तीच्या खुनाची उकल केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी अहमद शेख या व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा येथील एम.एम. व्हॅली परिसरात आढळला होता. अहमद शेख याची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याचसोबत त्याच्या शरिरावर जखमाही आढळल्या होत्या.

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांनी अहमद शेख याच्या परिवारापासून चौकशी करण्यास सुरुवात केली. या चौकशीत अहमदची पत्नी रुख्सार सतत आपला जबाब बदलत होती. यामुळे पोलिसांना रुख्सारवर संशय आला. अहमदचं कोणासोबत वैर होतं का असंही पोलिसांनी रुख्सारला चौकशीदरम्यान विचारलं…परंतू प्रत्येकवेळी रुख्सार वेगवेगळी उत्तरं द्यायला लागल्यामुळे तिच्यावरचा संशय बळावला. अखेरीस पोलिसी खाक्यासमोर रुख्सारने आपला गुन्हा कबुल केला.

रुख्सारचे काही दिवसांपासून मोहम्मद नाफीस शेख या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे अहमदपासून सुटका करुन घेण्यासाठी रुख्सारने मोहम्मद आणि आपली बहीण रेश्मा सय्यद हिच्या मदतीने अहमदची हत्या करण्याचा प्लान आखला. २७ फेब्रुवारी रोजी मोहम्मद शेख आणि अहमदला मुंब्रा येथील एम.एम. व्हॅली कंपाऊंड भागात गेले. यावेळी मोहम्मदने अहमदला भरपूर दारु पाजली. यानंतर अहमद स्वतःची सुरक्षा करु शकणार नाही याची खात्री पटल्यानंतर मोहम्मदने धारदार शस्त्राने गळा चिरुन अहमदची हत्या केली. यानंतर मोहम्मदने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपींनी हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT