निवडणुकीत पत्नीचा पराभव, विजयी उमदेवाराच्या समर्थकांकडून टोमणेबाजी; पतीने केली आत्महत्या

मुंबई तक

भद्रक (ओडिशा): ओडिशात (odisha) पंचायत निवडणुकीत (election) पराभव झाल्यानंतर लोकांच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचवेळी त्यांच्या पत्नीनेही (Wife) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अद्यापही ती मृत्यूशी झुंज देत आहे. वास्तविक, पंचायत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भद्रक (ओडिशा): ओडिशात (odisha) पंचायत निवडणुकीत (election) पराभव झाल्यानंतर लोकांच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचवेळी त्यांच्या पत्नीनेही (Wife) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अद्यापही ती मृत्यूशी झुंज देत आहे. वास्तविक, पंचायत निवडणुकीत या महिलेचा पराभव झाला, त्यानंतर विजयी पक्षाच्या लोकांनी महिलेच्या पतीला सातत्याने टोमणे मारण्यास सुरुवात केली होती.

रमाकांत परिदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची पत्नी सुमती परिदा सध्या कटक येथील एससीबी रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी याबाबत अशी माहिती दिली की, भद्रक जिल्ह्यातील बासुदेवपूर ब्लॉकमधील पद्मपूर ग्रामपंचायतीचे रमाकांत परिदा यांचा रविवारी संध्याकाळी विजयी मिरवणूक काढलेल्या अशोक नायक यांच्या समर्थकांशी बाचाबाची झाली.

वास्तविक पाहता, सत्ताधारी बीजेडीचा पाठिंबा असलेल्या अशोक नायक यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत परिदा यांच्या पत्नी सुमती यांचा पंचायत समिती सदस्यपदासाठी पराभव केला होता.

पोलिसांनी सांगितले की, ‘विजयी उमेदवाराचे समर्थक रविवारी संध्याकाळी विजयी रॅली काढत होते. त्यांनी रमाकांतला तिथे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीच्या पराभवावरुन त्याला टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर रमाकांत निराश होऊन घरी गेला आणि त्याने पत्नीशी देखील भांडण केलं. याच भांडणानंतर पत्नीने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

रमाकांतने गळफास लावून केली आत्महत्या

पत्नीची भीषण अवस्था पाहून रमाकांतनेही तात्काळ गळफास लावून आत्महत्या केली. रमाकांतला स्थानिक रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर त्यांच्या पत्नीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी परिदा यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रमाकांत यांच्या पत्नी सुमती परिदा यांचा पंचायत निवडणुकीत पराभव झाला होता. पत्नीने निवडणूक लढवू नये असे सुरुवातीपासून रमाकांत यांना वाटत होते. मात्र, तरीही सुमती यांनी निवडणूक लढवली. ज्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत राडा; दोन गटांच्या वादात रहिवाशांना मारहाण

भद्रक पोलिसांचे एसपी चरणसिंग मीना यांनी ‘इंडिया टुडे’ला माहिती देताना सांगितले की, ‘आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने रमाकांतला आपल्या पत्नीने निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. आणि पत्नीचा पराभव झाल्याने विजयी उमेदवाराचे समर्थक हे सातत्याने त्याला टोमणे मारत होते. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून दोघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला.’

हे वाचलं का?

    follow whatsapp