कुणी याकडे लक्ष देईल का? कलानगरमधील रहिवाश्यांची मुख्यमंत्री आणि अनिल परब यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे होतेय गैरसोय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील वांद्रे परिसरातील कलानगर भागात राहतात. ठाकरे कुटुंबियांचं निवासस्थान असल्याने आधीच या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था असते.

त्यात गेल्या २ वर्षांपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने कलानगर परिसरात जास्तीची सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसंच या परिसरात परिवहनमंत्री अनिल परब यांचंही निवासस्थान आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे मंत्रीमहोदय राहत असलेल्या भागातही कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र या सुरक्षाव्यवस्थेमुळे कलानगरमधील रहिवाश्यांची चांगलीच गैरसोय होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कलानगर परिसरात साहित्य सहवासमधील रहिवासी सायली राजाध्यक्ष यांनी आपल्या सोशल मिडीयावर यासंदर्भात एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात की

मी गेली 27 वर्षं वांद्रे पूर्व भागात राहते . कलानगरमध्ये ठाकरे कुटुंब राहात असल्यानं आम्हाला पोलीस गस्त चांगली असते . शिवाय या भागात सतत जाग असते .

ADVERTISEMENT

सध्या राज्य परिवहन मंडळाच्या ( एस टी ) कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे . परिवहन मंत्री अनिल परब याच भागात राहतात . तर गेले काही दिवस आमचा म्हाडाकडून खेरवाडीकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो बंद केलेला आहे . कारण मंत्री महोदयांची सुरक्षा व्यवस्था .

ADVERTISEMENT

त्यांच्या घरासमोर पोलीस असणं समजू शकते पण दिवसेंदिवस मुख्य रस्ता बंद करून त्या भागातल्या नागरिकांची आपण किती गैरसोय करत आहोत हे यांच्या लक्षात येत नसेल का ?

आमच्या भागात मुख्यमंत्री राहतात म्हणून एक मुख्य रस्ता बंद केलेला आहेच . आता हा एक रस्ता बंद . कुणी याकडे लक्ष देईल का ?

सायली राजाध्यक्ष यांनी लिहिलेल्या या पोस्टनंतर याच परिसरातील अनेक रहिवाश्यांनी त्यांच्या पोस्टवर आपल्याही याचा फटका बसत असल्याचे अनुभव सांगितले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या या गैरसौयीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब लवकरात लवकर घेतील का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT