अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपात जाणार का? या चर्चांमागचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. सेनेत बंडखोरी होऊन पूर्ण शिवसेना फुटली. त्यामुळे कोणता नेता कधी कुठे जाणार याचा काही नेम राहिलेला नाही. सध्या काँग्रेस पक्षातील एका मोठ्या नेत्याचं नाव सध्या चर्चेत आलंय. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचं. आता असं काय झालंय की अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत येतोय. ते काँग्रेस सोडून भाजप किंवा शिंदे गटात जाणार अशा चर्चाना का उधान आलंय, यावरच चर्चा करणारा हा रिपोर्ट.

ADVERTISEMENT

गेली अनेक वर्ष चव्हाण कुटुंब काँग्रेसमध्ये सक्रिय

अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षातील महत्वाचे नेते मानले जातात. अशोक चव्हाण हे २००८ ते २०१० अशा जवळपास दोन वर्षांच्या काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. गेली अनेक दशक चव्हाण कुटुंबीय हे काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. वेळोवेळी पक्षाने चव्हाण कुटुंबियांना त्यांच्या निष्ठेचं फळ दिलंय. फलस्वरूप मुख्यमंत्रीपदासह विविध खात्याचं मंत्रिपद, पक्षाच्या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळालीय.

अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा नेमकी कशी सुरू झाली?

मात्र असं सगळं असलं तरी आता अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडणार का? अशा चार्चाना उधान आले आहे. आता अशी चर्चा का होतीय, त्याला देखील काही कारणं आहेत. त्याचं झालं असं की, अशोक चव्हाण हे शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्या दरम्यान आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आभार मानले होते. पक्षविरोधी कार्यवाही केल्या प्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

हे वाचलं का?

नांदेडचे खासदार चिखलीकरांची ऑफर

दरम्यान, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना याआधी खुली ऑफर दिली होती. चव्हाण यांनी बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहून भाजपाला अप्रत्यक्षपणे मदतच केली आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू,” असे प्रतापराव चिखलीकर म्हणाले होते.

आदर्श घोटाळा आणि भाजपात प्रवेशाच्या चर्चा

अशोक चव्हाण हे आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यादरम्यान आदर्श सोसायटी घोटाळ्यात त्यांचं नाव आलं. हा घोटाळा इतका गाजला की त्यामुळे अशोक चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली. पुढे जाऊन काहीअंशी त्यांना दिलासा देखील मिळाला होता. मात्र, यातून वाचण्यासाठी अशोक चव्हाण भाजपात जातील, अशा चर्चा अधून- मधून होत असतात.

ADVERTISEMENT

काँग्रेस सोडण्यावरून अशोक चव्हाण यांचं उत्तर

तेंव्हापासून अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र या चर्चांना अशोक चव्हाण यांनीचं पूर्णविराम दिला. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, अशा चर्चांना महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती. त्यामुळे या चर्चा काहीप्रमाणात थांबल्या होत्या.

ADVERTISEMENT

सत्तार आणि चव्हाण यांच्यात अर्धा तास बंद खोलीत चर्चा

मात्र आता पुन्हा अशोक चव्हाण यांच्याबाबतीत वेगवेगळ्या संभावना वर्तवल्या जात आहेत. त्याच कारण म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे रविवारी नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. इतकंच नाही तर बंद दाराआड चर्चा देखील केली. यावेळी इतर कार्यकर्त्यांना देखील खोलीत एंट्री नव्हती. त्यामुळे या चर्चेत नेमकं दडलंय काय, अशी चर्चा सुरु झालीय. यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी आपण चव्हाणांकडून मार्गदर्शन घ्यायला आलो होतो, असं म्हणून वेळ मारून नेली. तर चव्हाणांनी ही औपचारिक भेट होती, असं सांगितलं.

सत्तार आणि चव्हाण यांच्या भेटीला इतकं महत्व का?

मात्र अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीला इतकं महत्व देण्याचं कारण म्हणजे सत्तार काँग्रेसमध्ये असताना चव्हाणांच्या जवळचे मानले जायचे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी जेंव्हा राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले त्यावेळी सुरुवातीला अब्दुल सत्तारही भाजपात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. तर तेंव्हा देखील अशोक चव्हाण आपले निकटवर्तीय विखे पाटील आणि सत्तार यांच्यासोबत भाजपात जाणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

चव्हाणांच्या भूमिकेकडे लक्ष

आता चव्हाण आणि सत्तार यांनी काहीही म्हणलं तरी बंद दाराआड चर्चेत नेमकं काय चर्चा झाली, यावर तर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यासोबत बंद दार खोलीत चर्चा झाल्याने चव्हाण पुन्हा चर्चेत आले आहेत. म्हणून आता भविष्यातील अशोक चव्हाणांच्या घडामोडींवर राज्याचं लक्ष लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT