Supriya Sule: “महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देईन”
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात पुणे येथील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यात भाजप कार्यकर्त्याकडून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं समोर आलं. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालं असून खासदार सुप्रिया सुळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत, यापुढे असा प्रकार घडला तर हात तोडून हातात देईन असा […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात पुणे येथील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यात भाजप कार्यकर्त्याकडून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं समोर आलं. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालं असून खासदार सुप्रिया सुळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत, यापुढे असा प्रकार घडला तर हात तोडून हातात देईन असा इशारा दिला आहे.
जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना सुप्रिया सुळेंनी आपली भावना व्यक्त केली. आमच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्यात स्मृती इराणींची भेट घेण्याची परवानगी मागितली. तिकडे त्यांना परवानगी नाकारली. नंतर त्या बालगंधर्व मध्ये गेल्या. जिकडे त्या बाल्कनीत बसल्या होत्या. महागाईवर प्रश्न विचारला म्हणून त्यांच्यावर हात उगारण्यात आल्या. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याच स्मृती इराणी विरोधीपक्षात असताना महागाईवर प्रचंड बोलायच्या, त्यांनी रान पेटवलं होतं.
ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहु-फुले-आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यात नेहमी महिलांचा मान सन्मान केला जातो. आता मी तुम्हाला सांगते आहे, यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने जर महिलेवर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः तिथे जाईन आणि कोर्टात केस करेन आणि हात तोडून हातात देईन.
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेस खासदार
बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर काहीकाळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. ज्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढत नंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.