मोदी सरकार नोटा-नाण्यांना पर्याय म्हणून Cryptocurrency आणणार? समजून घ्या
क्रिप्टोकरन्सीला भारतात व्यवहारांसाठी मान्यता मिळणार का? क्रिप्टोकरन्सी आणि रूपयामध्ये फरक काय? क्रिप्टोकरन्सीवर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय म्हणणं आहे? क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार कसे चालतात असे असंख्य प्रश्न सामान्यांना पडू लागले आहेत, आणि याच प्रश्नांची उत्तरं आज समजून घेणार आहोत. मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे, आणि रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल […]
ADVERTISEMENT

क्रिप्टोकरन्सीला भारतात व्यवहारांसाठी मान्यता मिळणार का? क्रिप्टोकरन्सी आणि रूपयामध्ये फरक काय? क्रिप्टोकरन्सीवर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय म्हणणं आहे? क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार कसे चालतात असे असंख्य प्रश्न सामान्यांना पडू लागले आहेत, आणि याच प्रश्नांची उत्तरं आज समजून घेणार आहोत.
मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे, आणि रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल करन्सीला चालना देण्यासाठीचं विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. एक गोष्ट निश्चित होतेय की क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांबाबत सरकार काहीतरी ठोस कायदे-नियम आणण्याच्या विचारात आहे. पण मोदी सरकारच्या प्लॅनआधी क्रिप्टोकरन्सीबाबतच्या काही बेसिक गोष्टी जाणून घेऊयात.
-
· बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये फरक काय?
बिटकॉईन हा क्रिप्टोकरन्सीचा एक भाग आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे. म्हणजेच ज्याला व्हर्च्युअल करन्सी म्हणतात. जशी बिटकॉईन एक क्रिप्टोकरन्सी आहे तशीच लाईटकॉईन, रिपल, इथेरियम, झेड कॅश अशा अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आल्या आहेत.