मार्क झुकरबर्ग Whatsapp विकणार?, यामुळे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या कमाईत पहिल्यांदाच मोठी घट झाली आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत मेटाच्या महसुलात घट दिसून आली आहे. त्याचा प्रभाव कंपनीच्या व्हॉट्सअॅप या अॅपवरही दिसत आहे. त्यामुळे मार्क झुकेरबर्ग व्हॉट्सअॅप विकणार असल्याची चर्चा आहे. अहवालानुसार मेटाच्या एकूण महसुलात 1 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यामुळे त्यांची कमाई 28.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 23 हजार […]
ADVERTISEMENT

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या कमाईत पहिल्यांदाच मोठी घट झाली आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत मेटाच्या महसुलात घट दिसून आली आहे. त्याचा प्रभाव कंपनीच्या व्हॉट्सअॅप या अॅपवरही दिसत आहे. त्यामुळे मार्क झुकेरबर्ग व्हॉट्सअॅप विकणार असल्याची चर्चा आहे. अहवालानुसार मेटाच्या एकूण महसुलात 1 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यामुळे त्यांची कमाई 28.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 23 हजार अब्ज रुपये) इतकी कमी झाली आहे.
तिसऱ्या तिमाहीतही त्यात घट होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. महिन्याच्या तिसऱ्या तिमाहीतही कंपनीला मोठा घाटा होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अंदाजानुसार तिसर्या तिमाहीत त्यांची कमाई सुमारे 20 हजार अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
मार्क झुकरबर्ग यांचा फोकस दुसऱ्या गोष्टीकडे
Facebook व्यतिरिक्त, Meta चा एकूण नफा देखील 36 टक्क्यांनी घसरून 6.7 अब्ज डॉलर झाला आहे. फेसबुककडे मेटाव्हर्स संदर्भात एक मोठी योजना आहे आणि कंपनीने त्यावर कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मार्क झुकरबर्ग मेटाव्हर्सच्या ड्रीम प्रोजेक्टवरती काम करत आहेत. या विभागात गेल्या तिमाहीत 2.8 अब्जांचा तोटा झाला होता.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनीने व्हॉट्सअॅपवर सर्वात मोठी गुंतवणूक केली होती, परंतु कंपनीला त्याचा कोणताही फायदा मिळत नाहीये. झुकरबर्ग यांच्यासमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. Instagram ला TikTok सारखे बनून वापरकर्त्यांना त्यांना अधिक गुंतवून ठेवायचे आहे.