वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले…

मुंबई तक

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्णही मुंबईत आहेत. महाराष्ट्रातल्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. तसंच मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा देखील 18 टक्क्यांच्यावर गेला आहे. अशात आता चर्चा सुरू झाली आहे की मुंबईत लॉकडाऊन लागणार का? जर कठोर निर्बंध लागले तर काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्णही मुंबईत आहेत. महाराष्ट्रातल्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. तसंच मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा देखील 18 टक्क्यांच्यावर गेला आहे. अशात आता चर्चा सुरू झाली आहे की मुंबईत लॉकडाऊन लागणार का? जर कठोर निर्बंध लागले तर काय काय बंद होणार? मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा पुन्हा बंद होणार का? याबाबत उत्तरं दिली आहेत ती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी.

कोरोना रूग्ण वाढल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

काय म्हणाले इकबाल सिंह चहल?

‘मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मंगळवारचा विचार केला तर लक्षात येईल की 10 हजारांपेक्षा जास्त रूग्णवाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 डिसेंबरला एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला टास्क फोर्स, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग असे सगळेच होते. तिथे हा मुद्दा मी नमूद केला होता की पॉझिटिव्हिटी रेट हा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लावण्यासाठीचा मापदंड होता. आता तिसरी लाट थोडी वेगळी आहे. तिसऱ्या लाटेत हा मापदंड न वापरता आपण दोन नवे मापदंड वापरायचे. पहिला मापदंड हा की किती टक्के बेड भरले आहेत? किती टक्के रिकामे आहेत? ती स्थिती समाधानकारक असेल तर लॉकडाऊनची गरज नाही. दुसरा मापदंड हा सांगितला की ऑक्सिजनचा वापर आपल्याला किती करावा लागतो आहे? त्यावर हे ठरवता येईल हे मी त्या बैठकीत सांगितलं होतं.’

हे वाचलं का?

    follow whatsapp