विंग कमांडर एस. एस. मराठे हॅरिस पुलाखाली पाण्यात कुटुंबासह अडकले, अग्निशमन दलानं वाचवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साठण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सोडवून सुरक्षित स्थळी नेलं जातं आहे. पुण्यातल्या खडकी भागात अशीच एक घटना घडली. खडकी-बोपोडी येथील हॅरिस पुलाखालच्या पाण्यात विंग कमांडर मराठे हे त्यांच्या कुटुंबासह अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

खडकी – बोपोडी येथील हॅरिस पुलाखालील पाण्यात विंग कमांडर एस एस मराठे हे त्यांच्या कारमध्ये कुटुंबासह अडकले होते. खडकी कॅन्टोन्मेंटच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही कार पाण्याबाहेर काढली. मराठे यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले, एक कुत्रा यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली.

हे वाचलं का?

मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बोपोडी हॅरिस पुला खालील रस्त्यावर पाणी आले आहे. विंग कमांडर एस. एस. मराठे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते नेहमीप्रमाणे पुलाखालील रस्त्यावरून कार घेऊन जात होते.

मात्र, मुख्य रस्त्यावरून कार हॅरिस ब्रिज च्या खालच्या रस्त्यावर ड्राईव्ह करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात बुडू लागली. स्थानिक नागरिकांनी खडकी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने कार आणि कारमधील व्यक्तींना बाहेर काढले.

ADVERTISEMENT

दरम्यान पुणे, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना ४८ तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन करण्यात आलं आहे. पुणे आणि इतर भागातील परिसरात असलेले गड किल्ले तसंच पर्यटनाची स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. ३१ जुलैपर्यंत ही पर्यटन स्थळं आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले लोहगड, विसापूर यांसह महत्त्वाचे गड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर १४४ कलम लागू होणार आहे. या सह इतर पर्यटन स्थळं अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात १४४ लागू कलम लागू करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT