राजांना मानाचा मुजरा… चिमुकलीला पोटाशी घेऊन कळसुबाई सर करणारी हिरकणी!
विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘पुत्र पाठीशी ढाल… हाताशी, कमरेला तलवार… स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार…’ या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर रचलेल्या शौर्यागीताची आठवण यावी अशी कठीण चढाई सोलापूरातल्या श्रुती गांधी या रणरागिणीने केली आहे. होय.. आपल्या 18 महिन्यांच्या मुलीला पोटाशी घेऊन श्रुती गांधी या आईने चक्क महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केलं आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा […]
ADVERTISEMENT

विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘पुत्र पाठीशी ढाल… हाताशी, कमरेला तलवार… स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार…’ या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर रचलेल्या शौर्यागीताची आठवण यावी अशी कठीण चढाई सोलापूरातल्या श्रुती गांधी या रणरागिणीने केली आहे. होय.. आपल्या 18 महिन्यांच्या मुलीला पोटाशी घेऊन श्रुती गांधी या आईने चक्क महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केलं आहे.
संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला वीरांचा आणि रणरागिनींचा हा महाराष्ट्र मुलुख आहे. याच महाराष्ट्रात जिजाऊ, छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे अनेक मावळे आणि हिरकण्या आजही आहेत. हेच श्रुती गांधी या एका महिलेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

माने परिवाराची लेक लग्न झाल्यावर गांधी परिवाराची सून झाली. श्रुतीवर शिवपराक्रमाचा पगडा आहे हे माहीत असल्याने तिला माहेर आणि सासरच्या अशा दोन्ही कुटुंबीयांनी तिला स्वातंत्र्य दिले. तशी ती दोन्ही कुटुंब ही शिवविचारांवर श्रद्धा ठेवणारी आहेत. त्यामुळे श्रुतीच्या गडकिल्ले भ्रमंतीला वाव मिळाला.









