पिवळ्या साडीतली मॅडमचं रुपडंच बदललं, ‘ती’ महिला अधिकारी नव्या गेटअपमध्ये पोलिंग बूथवर

मुंबई तक

लखनऊ: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पिवळी साडी परिधान केलेल्या महिला मतदान अधिकाऱ्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. आता 2022 च्या विधानसभा निवडणुकीत देखील तीच महिला मतदान अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रीना द्विवेदी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. लखनऊच्या रहिवासी असलेल्या रीना द्विवेदी या वेळी लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज बूथवर मतमोजणी करणार आहेत. मागच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लखनऊ: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पिवळी साडी परिधान केलेल्या महिला मतदान अधिकाऱ्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. आता 2022 च्या विधानसभा निवडणुकीत देखील तीच महिला मतदान अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रीना द्विवेदी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. लखनऊच्या रहिवासी असलेल्या रीना द्विवेदी या वेळी लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज बूथवर मतमोजणी करणार आहेत.

मागच्या वेळी पिवळ्या साडीत दिसलेली रीना द्विवेदी यावेळी वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून आली. सोशल मीडियाच्या हेडलाइन्स बनलेल्या रीना द्विवेदीने यावेळेस मात्र आपला गेटअप बदलला आहे. गेल्या निवडणुकीत रीना द्विवेदी पिवळ्या साडीत दिसली होती आणि पिवळ्या साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी मात्र रीना द्विवेदी वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळाली आहे.

वेस्टर्न ड्रेस आणि सनग्लास परिधान केलेल्या रीना द्विवेदी म्हणाल्या की, ‘मी मागच्या वेळी पिवळी साडी नेसली होती. यावेळी थोडा बदल झाला आहे. हा बदल होत राहायला हवा.’ रीना द्विवेदीचा नवा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रीना द्विवेदी लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.

sonu sood : सोनू सूदची कार जप्त; निवडणूक केंद्रावर जाण्यास बंदी

हे वाचलं का?

    follow whatsapp