फक्त आणि फक्त जिद्द ! मजुराच्या मुलाची मेहनतीच्या जोरावर मर्चंट नेव्हीत मोठ्या पदावर झेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी

ADVERTISEMENT

चांगलं शिक्षण आणि त्यानंतर नोकरी किंवा एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असायला हवी असा मतप्रवाह आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतो. परंतू वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील एका मजुराच्या मुलाने केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करत मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या पदावर झेप घेतली आहे.

कारंजा शहरात राहणारा नितेश जाधव लवकरच मर्चंट नेव्हीमध्ये दाखल होणार असून त्याने काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रो टेक्निकल ऑफीसर पदाची परीक्षा पास केली आहे.

हे वाचलं का?

येत्या जुन महिन्यात नितेश जाधव मर्चंट नेव्हीत आपल्या पदावर रुजु होणार आहे. नितेशने मिळवलेल्या या यशामुळे त्याचं सध्या सर्वस्तरातून कौतुक होतंय. परंतू हे यश गाठण्यासाठी त्याने केलेला प्रवास आणि त्याचा संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे. नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कारंजा बाजार समितीत हमालीचं आणि गरजेच्या वेळी मजुरीचं काम करतात. नितेशची आई ही गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही जाधव दाम्पत्याने नेहमी आपल्या मुलांना शिक्षण कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केले.

नितेशने कांरजा येथील नगर पालिकेच्या शाळेत आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्याने बी. ई. इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली आणि इतरांप्रमाणे शासकीय सेवेत नेाकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतू मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकीय सेवेत नेाकरी मिळणे कठीण झाल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये मर्चंट नेव्हीची परीक्षा देत त्यात ८१ टक्के गुण संपादन केले.

ADVERTISEMENT

नितेशने या परीक्षेच्या अभ्यासासाठी कोणाचीही मदत न घेता इंटरनेटला गुरु मानून अभ्यास केला. आपल्या पहिल्याच नोकरीत नितेशला प्रतिमहिना दोन लाख रुपये वेतन मिळणार असून जहाजावरील इलेक्ट्रीकची सर्व कामं त्याला पहावी लागणार आहेत. जिद्द, चिकाटी व मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकृत करुन शिक्षणाची वाट धरल्यास नोकरी मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही, हे नितेश ने सिद्ध करुन दाखवले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT