World Happiness Report : भारताच्या क्रमवारीत सुधारणा पण कामगिरी अजुनही निराशाजनकच
संयूक्त राष्ट्राद्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या World Happiness Report मध्ये यंदाच्या यादीत भारताच्या क्रमवारीत काही प्रमाणात सुधारणा नक्कीच झाली आहे. असं असलं तरीही देशाची एकंदरीत कामगिरीही निराशाजनकच राहिलेली आहे. जगात सर्वात आनंदी असलेल्या देशांच्या यादीत भारत १३९ व्या स्थानावरुन १३६ व्या स्थानावर आला आहे. दक्षिण आशियाई देशांपैकी फक्त तालिबानी शासन असलेला अफगाणिस्तान या यादीत भारताच्या मागे […]
ADVERTISEMENT
संयूक्त राष्ट्राद्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या World Happiness Report मध्ये यंदाच्या यादीत भारताच्या क्रमवारीत काही प्रमाणात सुधारणा नक्कीच झाली आहे. असं असलं तरीही देशाची एकंदरीत कामगिरीही निराशाजनकच राहिलेली आहे. जगात सर्वात आनंदी असलेल्या देशांच्या यादीत भारत १३९ व्या स्थानावरुन १३६ व्या स्थानावर आला आहे. दक्षिण आशियाई देशांपैकी फक्त तालिबानी शासन असलेला अफगाणिस्तान या यादीत भारताच्या मागे आहे.
ADVERTISEMENT
या उलट इतर सर्व आशियाई देशांची कामगिरी ही भारतापेक्षा चांगली राहिलेली पहायला मिळते आहे. ज्यात नेपाळ (८४ वं स्थान), बांगलादेश (९४ वं स्थान), पाकिस्तान (१२१ वं स्थान), श्रीलंका (१२७ वं स्थान) हे सर्व देश भारताच्या पुढे आहेत. अफगाणिस्तान हा एकमेव दक्षिण आशियाई देश या यादीत सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६ व्या स्थानावर राहिलेला आहे.
सलग पाचव्या वर्षी फिनलँड या देशाने बाजी मारत सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या Sustainable Development Solutions Network द्वारे प्रत्येक वर्षी जगातील आनंदी देशांची यादी जाहीर केली जाते. देशाचा GDP, सामाजिक परिस्थिती, व्यक्ती स्वातंत्र आणि भ्रष्टाचार या चार प्राथमिक निकषांवर ही यादी निश्चीत केली जाते.
हे वाचलं का?
फिनलँडने यंदाही पहिलं स्थान मिळवलं असून त्यामागोमाग डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड यांनी आपलं स्थान मिळवलं आहे. अमेरिकेने या यादीत १६ वं स्थान पटकावलं असून ब्रिटन १७ व्या तर फ्रान्स २० व्या स्थानावर राहिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT