Olympic पदक विजेत्या सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांकडून १ लाखांचं बक्षीस जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये झालेल्या हाणामारीत तरुण पैलवान सागर राणा याला आपले प्राण गमवावे लागले. सागर राणाच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारवर आहेत. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सुशील फरार झाला आहे. सुशीलची माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी दिल्ली पोलिसांनी १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

सुशील कुमारसोबतच सागर राणाच्या हत्येत सहभागी असलेल्या अजय या मल्लाचाही दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कोर्टाने सागर राणाच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केलं होतं.

४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये काही मल्लांमध्ये हाणामारी झाली. यात जखमी झालेल्या मल्लांवर नंतर रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान २३ वर्षीय सागर राणाचा मृत्यू झाला. सागर राणाला मारहाण करणाऱ्या मल्लांमध्ये सुशील कुमारचाही सहभाग असल्याचे पुरावे दिल्ली पोलिसांकडे आहेत. २००८ साली झालेल्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने ब्राँझ तर २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलने सिल्वर मेडल मिळवलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव मोठं करणाऱ्या सुशीलविरोधात आज हत्येचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT