राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहियाची गोळी झाडून हत्या, सोनीपतमधली धक्कादायक घटना
हरयाणा येथील सोनीपतमधे नॅशनल रेसलर निशा दहियाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. आलेल्या हल्लेखोरानी निशा दहियाच्या भावावरही गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. सोनीपतच्या हलालपूर गावात ही घटना घडली आहे. या गावात पैलवान सुशील कुमारच्या नावे एक अॅकेडमी आहे. त्या ठिकाणी निशा दहियावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. निशा दहिया, तिचा भाऊ सूरज आणि तिची […]
ADVERTISEMENT
हरयाणा येथील सोनीपतमधे नॅशनल रेसलर निशा दहियाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. आलेल्या हल्लेखोरानी निशा दहियाच्या भावावरही गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. सोनीपतच्या हलालपूर गावात ही घटना घडली आहे. या गावात पैलवान सुशील कुमारच्या नावे एक अॅकेडमी आहे. त्या ठिकाणी निशा दहियावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.
ADVERTISEMENT
निशा दहिया, तिचा भाऊ सूरज आणि तिची आई धनपती या सगळ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने सगळा परिसर हादरला होता. हा हल्ला केल्यानंतर हे अज्ञात हल्लेखोर तिथून पळून गेले. निशा आणि तिचा भाऊ सूरज या दोघांनी घटनास्थळीच प्राण सोडला. निशाची आई धनपती यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रोहतकच्या रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृतीही नाजूक आहे. हा हल्ला का झाला? हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हे वाचलं का?
सोनीपतमध्ये पोलिसांनी निशा आणि सूरज यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हाय प्रोफाईल मर्डर का झाला याची चौकशी आता पोलीस करत आहेत. या प्रकरणी काय काय अँगल असू शकतात? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
निशा दहियाने श्रीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चँपियनशिप स्पर्धेत 2014 सुवर्ण पदक जिंकलं आहे. 2014 मध्ये इंटरनॅशनल स्पर्धेतही निशा दहियानेही मेडल मिळवलं. एशियन चॅपिंयनशिपमध्येही 49 किलो गटात तिने मेडल जिंकलं. तर त्याच्या पुढच्या वर्षी 60 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT