Brijbhushan Singh : राज ठाकरेंना नडलेल्या BJP खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप
Sexual abuse allegations against Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर-प्रदेश दौऱ्याला विरोध केल्यामुळे चर्चेत आलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यासह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाविरुद्धही खेळाडूंनी आवाज उठवला आहे. याविरोधात कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक खेळाडू बुधवारी (१८ जानेवारी) जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसले […]
ADVERTISEMENT
Sexual abuse allegations against Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर-प्रदेश दौऱ्याला विरोध केल्यामुळे चर्चेत आलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यासह कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाविरुद्धही खेळाडूंनी आवाज उठवला आहे. याविरोधात कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक खेळाडू बुधवारी (१८ जानेवारी) जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसले आहेत.
ADVERTISEMENT
कुस्तीपटू आणि ऑलिंम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिने ट्विट करतं म्हटलं की, ‘खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण आमचा अपमान करण्याशिवाय फेडरेशनने काहीही केले नाही. मनाला वाटेल तसे कायदे करुन खेळाडूंना त्रास दिला जातो, असा गंभीर आरोप मलिकने केला आहे.
खिलाड़ी पूरी मेहनत कर के देश को मेडल दिलाता हैं लेकिन फेडरेशन ने हमें नीचा दिखाने के अलावा कुछ नहीं किया। मनचाहे क़ायदे क़ानून लगा कर खिलाड़ियों को प्रताड़ित किया जा रहा है। #BoycottWFIPresident#BoycottWrestlingPresident@PMOIndia @AmitShah @narendramodi
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) January 18, 2023
हे वाचलं का?
तर कुस्तीपटू विनेश फोगट याने कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियामधील प्रशिक्षकांवर आणि अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्ती फेडरेशन आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असून यावरुन आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही ऑलिम्पिकमध्ये गेले होतो तेव्हा आम्हाला फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही. त्यावेळेपासून आम्ही आवाज उठवत आहोत. यानंतर आम्हाला धमक्या देखील दिल्या गेल्या.
They (federation) interfere in our personal lives as well and bother us. They are exploiting us. When we went to olympics, we didn't have physio or a coach. Since we've raised our voices, we are being threatened, say wrestlers at Jantar Mantar pic.twitter.com/980MkmIvhp
— ANI (@ANI) January 18, 2023
ADVERTISEMENT
पुरुष प्रशिक्षकांकडून महिला खेळाडूंना आणि महिला प्रशिक्षकांना त्रास दिला जातो. जे प्रशिक्षक फेडरेशनच्या मर्जीतले आहेत त्यांच्याकडून महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तनही केलं जात. त्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं आहे, खुद्द फेडरेशनच्या अध्यक्षांनीच अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असाही खळबळजनक आरोप विनेश फोगाटनं केलं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, विनेश फोगट ट्विट करत म्हणाली की, ‘खेळाडूला स्वाभिमान हवा असतो आणि तो पूर्ण समर्पित होऊन ऑलिम्पिक आणि मोठ्या खेळांसाठी तयारी करतो, पण फेडरेशनने त्याला साथ दिली नाही तर त्याचं मनोबल खचतं. पण आता आम्ही झुकणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार!
खिलाड़ी आत्मसम्मान चाहता है और पूरी शिद्दत के साथ ओलंपिक और बड़े खेलो के लिए तैयारी करता है लेकिन अगर फेडरेशन उसका साथ ना दे मनोबल टूट जाता है।लेकिन अब हम नही झुकेंगे।अपने अधिकारों के लिए लड़ेंगे।#BoycottWFIPresident#BoycottWrestlingPresident@PMOIndia @narendramodi @AmitShah
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) January 18, 2023
बजरंग पुनियाने ट्विटरवर लिहिले, ‘फेडरेशनचे काम खेळाडूंना मदत करणे, खेळाच्या गरजा लक्षात घेणे आहे. काही अडचण असेल तर ती सोडवायला हवी. पण जेव्हा महासंघच समस्या निर्माण करतो तेव्हा तुम्ही काय कराल? आता लढायचे आहे, आम्ही मागे हटणार नाही. दरम्यान, या खेळाडूंनी जंतर-मंतरवर #Boycott WFI president आणि Boycott Wrestling President या हॅशटॅगसह ट्विटरवर मोहिम सुरु केली आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान कार्यलय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही टॅग केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT