राज्यातील 'या' 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकालाची तारीख एका क्लिकवर
Zilla Parishad elections : मतदानाची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या दिवशी संबंधित 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदार आपला कौल देतील. मतदानानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील 'या' 12 जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा
मतदान अन् निकालाची तारीख एका क्लिकवर
Zilla Parishad elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. या घोषणेमुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, ग्रामीण भागातील राजकीय तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अर्ज भरण्याची अन् माघारीची तारीख
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 21 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, ती 27 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
मतदान अन् निकालाची तारीख
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार रिंगणात आहेत, हे समोर येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या दिवशी संबंधित 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदार आपला कौल देतील. मतदानानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.










