गदाधारी नाही तुम्ही तर ‘गधाधारी’, देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऋत्विक भालेकर, प्रतिनिधी, मुंबई

ADVERTISEMENT

आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी बेस्टच्या कार्यक्रमात म्हणाले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमचं हिंदुत्व गदाधारी आहे की नाही माहित नाही. तुमच्याकडे पाहून मात्र तुम्ही ‘गधाधारी’ आहात याची खात्री पटते असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.

घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये-उद्धव ठाकरे

ADVERTISEMENT

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ADVERTISEMENT

“हिंदुत्व हे जगण्यासाठी असतं. जगताना राष्ट्र प्रथम ही जी भावना आहे त्या भावना अत्यंत महत्त्वाच्या असतात. या भावना आपल्या कर्तृत्वात उतरवणारे अमित शाह आहेत. मगाशी अतिशय करेक्ट उल्लेख ज्योत्स्नाताईंनी केला की हिंदू असण्याचा त्यांना गर्व आहे. या देशात आपण पाहिलं की काही लोकांना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर नवीन हिंदुत्व आलंय. घंटाधारी आणि गदाधारी. मी असं म्हटलं घंटाधारी आणि गदाधारी असं म्हणताय, ते म्हणाले आम्ही गदाधारी आहोत.

मी त्यांना म्हटलं तुम्ही गदाधारी आहात की नाही माहित नाही, मात्र रोज सकाळी टीव्ही पाहिल्यानंतर तुम्ही ‘गधाधारी’ नक्कीच आहात हे आमच्या लक्षात येतं. हिंदुत्व हे संकुचित नाही. त्यामध्ये जातीभेदाला स्थान नाही. हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता, हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता. हाच भाव घेऊन हिंदुत्व जगणारे नेते कुणी असतील तर त्या व्यक्तीला अमित शाह असं म्हणतात.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं?

“राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा देखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तो निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर बांधतानाही तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवल्या आहेत. तुमचं हिंदुत्व आहे कुठे? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे ते हेच आहे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवायला जाऊ नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. हनुमान चालीसा पठण करायचं आहे खुशाल करा. रामदासस्वामींनीही अप्रतिम मारूती स्तोत्र लिहून ठेवलं आहे. भीमरूपी महारूद्रा.. भीमरूप आणि महारुद्र रूप काय असतं तर शिवसेनेच्या अंगावर आलात तर दाखवायला कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा. ” असं म्हणत भाजपवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. गदाधारी आहात की नाही माहित नाही तुम्ही गधाधारी आहात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT